• Download App
    शरद पवारांची घरातच "पॉवरफुल" खेळी; अजितदादांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली!!|Sharad Pawar's "powerful" move at home; Ajitdad's Sakkhya Bhav left his support!!

    शरद पवारांची घरातच “पॉवरफुल” खेळी; अजितदादांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात इतरांची घरे फोडण्याचा ठपका असलेल्या शरद पवारांनी आपल्या घरातच “पॉवरफुल” खेळी केली आणि अजितदादांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली. अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर काटेवाडीत तिखट शब्दांमध्ये शरसंधान साधत आपल्या काकांची साथ दिली आहे. अजित पवार विरुद्ध त्यांचे सगळे कुटुंब एकवटले आहे.Sharad Pawar’s “powerful” move at home; Ajitdad’s Sakkhya Bhav left his support!!

    अजित पवारांचे सख्खे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याने आधीच अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटाची कास धरली आहे. त्यांच्याबरोबर श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवारांचे साथ सोडून शरद पवारांची साथ दिली आहे.



    काटेवाडीतल्या एका कार्यक्रमात बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. पवारांचे नाव संपवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चाल खेळली आणि त्यात अजितदादा अडकले. अजितदादांनी वेगळा निर्णय घ्यायला नको होता. मी त्यावेळेस त्यांना हे स्पष्ट सांगितले होते. कुणी आपल्याला काही देत असेल, तर त्याच्यामागे जायचे कारण नाही. अजित पवारांना दिलेली सगळी पदे ही साहेबांनीच दिली. साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, याची जाणीव मी अजितदादांना करून दिली होती. पण त्यांनी ऐकले नाही, अशा शब्दांमध्ये श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर प्रहार केले.

    वडिलांनी आपल्या नावावर जमीन करून दिली तर त्यांना वृद्धापकाळी आपण घराबाहेर काढू नये. आज साहेबांचे वय 83 आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या मनाला काय वाटले असेल, याचा विचार अजितदादांनी करायला हवा होता. अजितदादांकडे त्यांनी राज्य सोपवले होते. साहेब स्वतः दिल्ली सांभाळत होते. अजितदादांनी हे वाटप मान्य करायला हवी होती, असा टोलाही श्रीनिवास पवार यांनी हाणला.

    शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणात पवारांच्या घरातले भाकित वर्तविले होते. मला एकटे पडले जाईल. लोकांना भावनिक केले जाईल. माझे सगळे नातेवाईक माझ्या विरोधात उभे राहतील, पण तुम्ही माझी साथ सोडू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना केले होते, ते अत्यंत खरे ठरले. पवारांची घरातच मोठी “पॉवरफुल” खेळी झाली आणि अजितदादांच्या सख्ख्या भावाने त्यांची साथ सोडली.

    Sharad Pawar’s “powerful” move at home; Ajitdad’s Sakkhya Bhav left his support!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा