• Download App
    पवारांचा शपथनामा : 10 उमेदवारांच्या बळावर सूर्य - चंद्र आणू मतदारांच्या दारावर!!|Sharad pawar's NCP contesting only on 10 loksabha seats but published high profile manifesto of the party

    पवारांचा शपथनामा : 10 उमेदवारांच्या बळावर सूर्य – चंद्र आणू मतदारांच्या दारावर!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी भलामोठा जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याला शरद पवारांचा शपथनामा असे नाव दिले आहे. पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या देशभरातल्या एकूण 543 जागांपैकी फक्त 10 जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक लढवत असल्याने पवारांचा शपथनामा म्हणजे “10 उमेदवारांच्या बळावर सूर्य – चंद्र आणू मतदारांच्या दारावर!!” असे म्हणायची वेळ आली आहे. करण पवारांच्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनेच तशी भरघोस दिली आहेत, जी पूर्ण करताना पवारांचे दहाच्या दहा उमेदवार निवडून येऊन खासदार झाले, तरी त्यांची दमछाक होणार आहे!! जाहीरनामा समितीच्या प्रमुख वंदना चव्हाण यांनीच तशी कबुली दिली आहे.Sharad pawar’s NCP contesting only on 10 loksabha seats but published high profile manifesto of the party



    पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. याला ‘शपथनामा’ असे नाव दिले. या जाहीरनाम्यातून घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जाहीरनामा प्रमुख वंदना चव्हाण यांच्या उपस्थित हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली.

     पवारांचा शपथनामा

    • स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून त्या 500 रुपयांपर्यंत निश्चित करू. त्यासाठी आवशक्यता लागल्यास केंद्र सरकार त्याला सबसीडी देईल. यूपीए सरकारच्या काळात जशा गॅसच्या किमती होत्या. त्याचप्रमाणे आता किमती ठेवल्या जातील.
    •  पेट्रोल आणि डिजेलवरील कराची पुनर्रचना करू. देशातील महागाई वाढण्यासाठी पहिले कारण म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर आहे. हे दर आम्ही मर्यादीत ठेवू.
    • केंद्रात 30 लाखांहून अधिक शासकिय नोकऱ्या रिक्त आहेत. त्या रिक्त जागा आम्ही सरकारमध्या सामील झाल्यास भरू आणि देशातील जनतेला चांगली सेवा देण्याचा आग्रह करू.
    •  शासकीय नोकरीत महिलांना 50 % आरक्षण ठेवण्याचा आग्रह करू.
    • देशात जीएसटी कर नागरिकांना लुबाडण्याचे काम करत आहे. जीएसटी कराबाबत केंद्र सरकारचा हस्तक्षेप कमी ठेवत, संबंधित राज्यांना जीएसटी कर ठेवण्याचे अधिकार देऊ.
    • देशातील अप्रेंटिस कायदा मंजूर करताना एखादा विद्यार्थ्याने डिग्री आणि डिप्लोमामध्ये पदवी मिळवल्यास त्याला पहिल्या एक वर्षासाठी स्टायपेंड दिले जाईल. 8500 रुपये स्टायपेंड दिला जाईल.
    • सरकार आल्यावर देशातील स्पर्धा परीक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ केले जाईल. महिला आणि मुलींसाठी स्त्री शिक्षणात असलेले अडथळे आम्ही दूर करू.
    •  समाज शाळा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करू. शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करू.
    • शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू

    सत्तेवर आल्यावर जातीनिहाय जनगणना करू.

    आरक्षणाची 50 % अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करू.

    • जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू.
    •  आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 % टक्क्यांपर्यंत, तर शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 % पर्यंत करू.
    • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0 % जीएसटी असणार.
    •  खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू.
    • अग्निवीर योजना आम्ही बंद करू.
    • वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू.
    • प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ.
    • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू.

    वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत. 5 वर्षांसाठी आमचे खासदार निवडून जातील, त्यांना हे विषय कमी पडतील, असे वंदना चव्हाण म्हणाल्या.

    Sharad pawar’s NCP contesting only on 10 loksabha seats but published high profile manifesto of the party

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस