विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असूनही आम्ही कमी जागा घेतल्या, पण विधानसभेला आम्ही कमी जागा घेणार नाहीत. जागा वाटपावरून मविआत फूट पडू शकते, असा इशारा शरद पवारांनी गुरुवारी काँग्रेस, उद्धवसेनेला दिला. जागा वाटपावरून महायुतीमध्येही बिनसू शकते, असेही ते म्हणाले.Sharad Pawar’s direct warning to Congress, Uddhav Thackeray will not take less seats in Legislative Assembly like Lok Sabha
लोकसभेला उद्धवसेनेने २१, काँग्रेसने १७, शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या. या संदर्भात एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत विधानसभेला मविआने एकत्रच लढावं, अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला २८८ जागा आहेत. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला ४८ च जागा होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला आहे. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जादा जागा घेऊन जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. पण तिघांनी एकत्र राहण्याचे सूत्र आम्ही सर्वांनी पाळले.
आम्ही किंवा उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत
केंद्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही. उद्धव ठाकरेही भाजपसोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत. बारामती लोकसभेला पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात, पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही, असे पवार म्हणाले.
Sharad Pawar’s direct warning to Congress, Uddhav Thackeray will not take less seats in Legislative Assembly like Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- बिल्डरच्या पोराच्या नावाने सोशल मीडियावर रॅप सॉंग व्हायरल; एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल!!
- काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचे निधन
- छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत सात नक्षलवादी ठार
- काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हरमिंदर सिंग जस्सी भाजपमध्ये दाखल!