• Download App
    शरद पवारांची चाणक्यनिती, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, गडकरींचे मात्र कौतुक, पाच वर्षांत सत्ता होती, मग, विदर्भ विकास का झाला नाही?|Sharad Pawar's criticism of Devendra Fadnavis, Gadkari's appreciation, he was in power for five years, then, why Vidarbha development did not happen?

    शरद पवारांची चाणक्यनिती, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, गडकरींचे मात्र कौतुक, पाच वर्षांत सत्ता होती, मग, विदर्भ विकास का झाला नाही?

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चाणक्यनितीचा अवलंब करत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. पाच वर्षे सत्ता असतानाही विदर्भाचा विकास का झाला नाही असा सवाल त्यांनी केली.Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis, Gadkari’s appreciation, he was in power for five years, then, why Vidarbha development did not happen?

    नागपूर येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधताना पवार म्हणाले, प्रादेशिक असमतोलामुळे काही भागातील विकासाला चालना मिळू शकली नाही. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाºयांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. पाच वर्ष विदर्भाकडेच राज्याची सत्ता होती, मात्र असे असूनही येथील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाहीत. मुळात समस्या सोडविण्यासाठी नेतृत्वात विकास दृष्टी असावी लागते.



    मात्र, त्यानंतर पवार यांनी गडकरी यांचे कौतुक करायला सुरूवात केली. ते म्हणाले,केंद्र सरकारमध्ये काही नेते असे आहेत जे पक्ष, प्रांत यांचा विचार न करता पूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतात. अगदी विरोधी पक्षाचा खासदार असो किंवा संसदेतील कुठलाही सदस्य, त्यांची समस्या दूर करण्याची इच्छा दाखविणारे कमी मंत्री आहेत. त्यात नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने येते. त्यांच्यासमोर समस्या आल्या की, त्याचा तोडगा ते काढणार हा विश्वास आहे.

    राज्यात झालेल्या हिंसाचारामागे मतांच्या ध्रुवीकरणाचे षडयंत्र असल्याच्या फडणवीस यांच्या आरोपावर टोला लगावताना पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील असे बोलले असते तर, मला काही वाटले नसते, परंतु फडणवीसांकडून असे वक्तव्य आल्याने आश्चर्य वाटले. सत्ता गेल्यावर माणसे किती अस्वस्थ होतात, हे दिसून येते. पण, त्या अस्वस्थतेतून इतके टोकाला जाऊ नये.

    Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis, Gadkari’s appreciation, he was in power for five years, then, why Vidarbha development did not happen?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस