शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या गल्लीपासून ते दिल्लपर्यंत राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कोणावर सोपवली जाणार? याची. तर दुसरीकडे शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व स्वत:कडेच कायम ठेवावं, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी जोरदार मागणी करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज खुद्द शरद पवारांनी एक मोठं विधान केलं आहे. Sharad Pawars big statement about NCP leadership He said to the workers The final decision will be made after two days
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना उद्देशून सांगितले की, ‘’मला खात्री होती की जर मी राजीनामा देत असल्याचं जाहीर करण्याअगोदर तुमच्याशी चर्चा केली असती, तर तुम्ही होय म्हणाला नसता. तुमच्या भावनांचा आदर केली जाईल. आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतर आपण निर्णय घेऊ. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही.’’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पक्षात खळबळ उडाल्याने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पक्षातील एका गटाला अजित पवारांना नवे अध्यक्ष म्हणून पाहायचे आहे, तर दुसरा पक्ष शरद पवारांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षपदी बसवून रिमोट कंट्रोलने पक्ष चालवण्याचा प्रयत्न करावा असे वाटत आहे.
Sharad Pawars big statement about NCP leadership He said to the workers The final decision will be made after two days
महत्वाच्या बातम्या
- खरा राजकीय स्फोट : राष्ट्रवादी पुरस्कृत सगळ्या वज्रमूठ सभा रद्द??; महाविकास आघाडीच्या एकजुटीत पाचर??
- पवारांच्या निवृत्ती नाट्यातही सर्व काही आलबेल नाही; राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीची जयंत पाटलांना माहितीच नाही!!
- PPF Scheme मध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमचीही लॉटरी लागली समजा, कारण…
- खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत!!