विशेष प्रतिनिधी
नागपूर : Dharmaraobaba Atram माझ्याविरुद्ध माझ्या मुलीला उभे करणे ही शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील मोठी चूक असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात वडिलांविरुद्ध मुलगी असा सामना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर यासाठी धर्मरावबाबाआत्राम यांनी शरद पवार यांना जबाबदार धरले आहे.Dharmaraobaba Atram
यावेळी विधानसभेत कधी नव्हे ती ऐतिहासिक निवडणूक होत असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे. माझी मुलगी माझ्या विरोधात असली तरी देखील त्याचा काही टक्केच फरक पडेल, असा दावा देखील त्यांनी केला. निवडणुकीच्या निकालामध्ये माझी मुलगी चार किंवा पाच नंबरवर राहणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या 52 वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे. मागील चार वर्षे आधीच या मतदार संघाची जबाबदारी माझी मुलगी आणि जावयांवर दिली होती. तेच हा मतदारसंघ पाहत होते. मात्र ते शरद पवार यांच्याकडे का गेले? हे मला माहीत नसल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी माझे घर फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी ही मोठी चूक केली असल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे.
बारामती मध्ये घर फुटले आणि अहेरी मध्ये घर फोडण्याचे काम त्यांनी केले. माझ्या विरोधात मुलीला उभा केले ही त्यांची राजकीय जीवनात फार मोठी चूक आहे. स्वतः पवार साहेब इकडे आले आणि फिरले तरी देखील काही फरक पडणार नसल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे. आत्राम यांनी या वेळी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी हा मतदारसंघ आत्राम या राजघराण्याचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. दक्षिण गडचिरोलीतल्या आदिवासी मतदारसंघात आत्राम घराण्याचा मोठा प्रभाव आहे. मात्र आता या मतदारसंघातच वडील विरुद्ध मुलगी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आता राज्याचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar’s big mistake was pitting his daughter against him; Dharmaraobaba Atram criticizes
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
- Ramgiri Maharaj रामगिरी महाराज : ट्रम्पच्या निवडणुकीत हिंदूंची एकजूट उपयोगी ठरू शकते, तर भारतात का नाही उपयोगी ठरणार??
- Virat Kohli : विराट कोहली जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी बरा झाला नाहीतर…
- Piyush Goyal : पियुष गोयल यांचा वाहन कंपन्यांना सल्ला ; ‘विक्री वाढवण्यासाठी…’