• Download App
    बारामतीत मतदानाची टक्केवारी घटली; बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्याची लक्षणे प्रत्यक्षात दिसली!! Sharad pawar's baramati bastion destroyed by less voting percentage

    बारामतीत मतदानाची टक्केवारी घटली; बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्याची लक्षणे प्रत्यक्षात दिसली!!

    विनायक ढेरे

    नाशिक : शरद पवारांनी आपल्या 50 वर्षांच्या संसदीय राजकीय आयुष्यात टिकवून ठेवलेला बारामती नावाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला, याची राजकीय लक्षणे 2024 मध्ये प्रथमच दिसली. Sharad pawar’s baramati bastion destroyed by less voting percentage

    किंबहुना महाराष्ट्रात पवार नावाचा ब्रँड आता पूर्ण आकुंचित झाला, याची अधिक बोचणारी जाणीव बारामतीच्या नीचांकी मतदानातून अधोरेखित झाली.

    ती लक्षणे अशी :

    • शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना पहिल्यांदाच बारामतीत खूप दिवस तळ ठोकावा लागला. पवार संपूर्ण राजकीय आयुष्यात या दुष्काळी गावांमध्ये गेले नव्हते, त्या दुष्काळी गावांमध्ये त्यांना पायधूळ झाडावी लागली.
    • राजकीय आयुष्यात ज्यांच्याशी कायम दुश्मनी केली, त्या थोपटे + काकडे यांच्यासह पवारांना बाकीच्या सर्व परिवारांच्या घरी जावे लागले.
    • बारामतीत पवारांनी कधीही इमोशनल कार्ड खेळले नव्हते, ते इमोशनल कार्ड 2024 मध्ये प्रथमच खेळावे लागले. अजित पवारांना या मुद्द्याचा वारंवार उल्लेख करावा लागला. अजित पवारांचे हे “इमोशनल अँटी” कार्ड ठरले.
    • पवार बारामतीत नेहमी सहज जिंकत तरी देखील मतदारांना आपण गृहीत धरू नये, असे ते वारंवार म्हणत असत. याचे दाखले त्यांच्या जुन्या निवडणुकांच्या रिपोर्टिंग मध्ये मिळतील. पण 2024 मध्ये प्रथमच मतदारांना खरंच गृहीत धरता कामा नये याची जाणीव पवारांना झाली. म्हणूनच पायाला भिंगरी लावून त्यांनी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार केला.


    • प्रचाराची प्रचंड रणधुमाळी गाजवून माध्यमांमध्ये सर्व प्रतिष्ठा पणाला लावून दोन्ही पवारांना बारामतीची निवडणूक लढवावी लागली, पण तरी देखील दोन्ही पवारांची बारामतीच्या मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्यात शक्ती कमी पडली. बारामतीत पवारांच्या राजकीय आयुष्यातले सर्वात नीचांकी मतदान झाले.
    • शरद पवारांची प्रतिष्ठा धोक्यात आहे किंवा अजित पवारांनी काम केले, तर त्यांना त्याचे फळ दिलेच पाहिजे या दोन्ही हेतूंनी किंवा यापैकी एका हेतूने देखील बारामती लोकसभा मतदारसंघांतले 50% पेक्षा जास्त मतदार मतदानाला बाहेरच पडले नाहीत.
    • आपण कोणाला मतदान केले हे कुणाला तरी सांगावे लागेल, या भीतीने तो घरात बसला, असे मिथक माध्यमांनी पसरवले तरी दोन्ही पवारांची मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्यात शक्ती कमी पडली ही वस्तुस्थिती लपून राहिली नाही.
    • पवारांच्या राजकीय आयुष्यात प्रथमच बारामतीत मतदानासाठी पैसे वाटले गेल्याचा आरोप झाला. त्यातून पीडीसीसी बँकेच्या शाखांच्या विश्वासार्हतेवर शंका तयार झाली. बारामती शाखेवर तर थेट गुन्हाच दाखल झाला. पण मूळात पवारांना बारामतीच्या बालेकिल्ल्यात मतदानासाठी पैसे वाटावे लागले, ही बातमी बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्याची ठळक लक्षण दाखवून गेली. कारण कुठल्याही मतदारसंघात पैसे वाटून विजय होणार असेल, तर त्या मतदारसंघाला बालेकिल्ला कसे काय म्हणता येईल??
    • शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात 48 पैकी फक्त 10 जागा लढविल्या. त्यातल्या बारामती आणि माढा सर्वाधिक प्रतिष्ठेच्या केल्या, पण या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान मात्र 50 % च्या आसपास झाले. याचा अर्थ पवार आपल्या मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढू शकले नाहीत. किंवा पवारांच्या प्रतिष्ठेसाठी बाहेर पडून आपण मतदान केले पाहिजे, असे मतदाराला वाटले नाही. बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्याचे हे महत्त्वाचे लक्षण दिसले, असे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे??
    • बारामतीत आता कोणीही जिंकून येवो, “मूळचा पवार” जिंकून येवो किंवा “बाहेरून आलेल्या पवार” जिंकून येवोत, त्यांना मिळालेला कौल हा बारामतीच्या एकूण मतदानाच्या 20% ते 30 % रेंज मधलाच असेल, कारण मूळात मतदानाचा 56.7 % झाले आहे. याचा अर्थ आतापर्यंत पवार ज्या बारामतीला आपला बालेकिल्ला समजत होते, त्या बालेकिल्ल्यात जिंकून येणाऱ्या पवारांना मिळणारा पाठिंबा हा फक्त 20 % ते 30 % रेंज मधलाच असेल. मग बारामती हा पवारांचा बालेकिल्ला उरलाय, असे कसे म्हणायचे??, हा कळीचा सवाल आहे.

    Sharad pawar’s baramati bastion destroyed by less voting percentage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!