विशेष प्रतिनिधी
पुणे : बड्या बापाच्या बेट्याने पोर्शे कार वेगात चालवून दोन इंजिनियर्सचे बळी घेतले. या अपघात प्रकरणाचे राज्यभरात चर्चा सुरू असताना अग्रवाल आणि पवार संबंधांवर राज्यभरात चर्चा सुरू झाली. नेमक्या कोणत्या पवारांच्या आमदारांनी अपघातातल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला?? पवार आणि अग्रवाल यांचे संबंध नेमके काय??, यावर राजकीय वर्तुळात खल झाला. पवार काका – पुतण्यांच्या पक्षांनी एकमेकांवरच आरोप केले. Sharad pawar’s anger erupts as journalists asked him about Porsche car accident
या पार्श्वभूमीवर शरद पवारांना पोर्श अपघात अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ते पत्रकारांवर संतापले. पालकमंत्री कुठे आहेत??, हे तुम्ही त्यांना विचारा. मला विचारून काय मिळणार?? राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात आपली जबाबदारी पार पाडली आहे. या प्रकरणाला उगाच वेगळे वळण देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी आपला संताप व्यक्त केला.
या गंभीर अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल, त्याचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची चौकशी झाली. आरोपी वेदांतला सुधार गृहात पाठविले. विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. परंतु, दरम्यानच्या काळात अग्रवाल आणि पवार यांचे संबंध चर्चेचा विषय ठरले, तसेच पवारांचा निकटवर्ती विशाल पाटील हा वेदांत अग्रवालचा वकील असल्याने राष्ट्रवादी भोवती संशयाचे मळभ निर्माण झाले. अशातच शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि दुष्काळाचा प्रश्न मांडला. पोर्श अपघात प्रकरणी त्यांना एक प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांचा संताप झाला.
अश्विनी कोस्ट, अनिश अवधियांचा मृत्यू
पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले.
शरद पवार यांचा संताप
पोर्श प्रकरणात पालकमंत्री का आले नाहीत??, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. वकिलाबरोबर फोटो छापला म्हणजे म्हणजे त्याच्याशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध कसा काय जोडता?? एखाद्या पेपरने माझा फोटो छापला असेल, म्हणून लगेच त्याचा संबंध का लावता?? प्रत्येक गोष्टीवर मी भाष्य करणे गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडलेली दिसते आहे. मग त्या गोष्टीला वेगळे स्वरुप देण्याची आवश्यतकता नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
पोलीस आयुक्त काय म्हणाले??
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही. रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो हे प्रकरण असे आहे की अल्पवयीन मुलाला हे माहीत होतं की दारु पिणे आणि अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवणं यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही या प्रकरणात कसून तपास करतो आहोत तसंच ठोस पुरावे गोळा करत आहोत. तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.