• Download App
    अजितदादांच्या बंडाला "खरा" ब्रेक; जिल्हा ते राज्य पातळीपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना शरद पवारांचे बढतीच्या मधाचे बोट!! Sharad Pawar withdrew his retirement decision within 3 days

    अजितदादांच्या बंडाला “खरा” ब्रेक; जिल्हा ते राज्य पातळीपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना शरद पवारांचे बढतीच्या मधाचे बोट!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 3 दिवस निवृत्ती नाट्य घडवून खऱ्या अर्थाने अजितदादांचे बंड रोखले आहे. पण त्याचे राजकीय इंगित 3 दिवसांमधल्या निवृत्ती नाट्याच्या कथानकात नव्हते, तर आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांनी केलेल्या एका विशिष्ट घोषणेत अजितदादांचे बंड रोखण्याचे खरे राजकीय इंगित दडले आहे.Sharad Pawar withdrew his retirement decision within 3 days

    पवारांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा तर मागे घेतलीच, पण त्याच वेळी उत्तराधिकाऱ्यासंदर्भात वेगळे भाष्य करून संघटनात्मक पातळीवर अमुलाग्र फेरबदलाचे फार मोठे संकेत दिले आणि यामध्येच अजितदादांचे संभाव्य बंड रोखण्याची राष्ट्रवादीची “खरी ताकद” दडली आहे.

    शरद पवार म्हणाले, की पक्षात नेतृत्वाची नवी फळी यावी यासाठी बदल केले जातील. गेली 10 – 15 वर्षे जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर जे पदाधिकारी काम करत आहेत आणि ज्यांच्यात अधिक काम करण्याची क्षमता आहे, त्यांना बढती देऊन जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेश पातळीवर आणि प्रदेश पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल.

    याचा अर्थच अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीतले जे पदाधिकारी बाहेर पडण्याची दाट शक्यता होती, त्या सर्वांना पवारांनी जिल्हा आणि प्रदेश पातळीवर बढती देऊन कामाची संधी देण्याचे मधाचे बोट लावले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर स्वतः शरद पवारच आपल्याला बढती देत असतील, तर अजितदादांबरोबर जाऊन फायदा काय??, असा शंकेचा किडा पवारांनी अनेक जिल्हा आणि प्रदेश पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात सोडून दिला आहे.



    अर्थातच शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी शिवसेनेत जे घडले, म्हणजे फक्त आमदारच नव्हे, तर स्थानिक पातळीवरचे छोटे – मोठे पदाधिकारी देखील नंतर बंड करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊन बसले, ती शक्यता पवारांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत रोखून धरली आहे.

    अजितदादांना दिली होती कल्पना

    इतकेच नाही तर आपण निवृत्त होणार असल्याची कल्पना अजित पवारांना दिली होती. पण प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांना तशी कल्पना दिली नव्हती, असेही पवारांनी स्पष्ट केले.

    कार्याध्यक्षपद सुप्रिया सुळेंना अमान्य

    त्याचवेळी उत्तराधिकारी म्हणजे व्यक्तीचा नसून संघटनात्मक पातळीवरच्या बदलाचा आहे, असे सांगून पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्ष पदाची सूचना स्वतः सुप्रिया सुळे आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळल्याचे स्पष्ट केले.

    पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत

    याचा अर्थ राष्ट्रवादीत स्वतः पवार संपूर्ण लक्ष घालून फार मोठे फेरबदल घडविणार आहेत. त्यातून त्यांनी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात बढती मिळून कामाची संधी मिळण्याची आशा पल्लवीत केली आहे आणि इथेच अजितदादांच्या संभाव्य बंडाची शक्यता सध्यातरी थंडावल्याचे दिसत आहे!!

    Sharad Pawar withdrew his retirement decision within 3 days

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा