विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “भटकती आत्मा” या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळेच “चैतन्य” निर्माण केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते खूप भडकले, पण त्यांचा “जाळ” छोटाच निघाला. कारण त्यांच्या पक्षाचा साईज खूप रोडावला आहे. Sharad Pawar was never restless for development
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि स्वतः शरद पवार किंवा अगदी सुप्रिया सुळे या 5 – 7 नेत्यांखेरीज दुसरे कोणी काही बोलूच शकले नाही. काँग्रेसच्या 2 – 3 नेत्यांनी थोडेफार आवाज टाकले. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी आवाज टाकला. उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या सभेतून आवाज टाकला, पण एकूण सगळे आवाज लवंगी फटाक्यांसारखेच निघाले.
पण त्या पलीकडे जाऊन स्वतः शरद पवारांनी मात्र होय आपण आहोत अस्वस्थ आत्मा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अस्वस्थ आहोत. महागाईच्या मुद्द्यावरून अस्वस्थ आहोत. हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे म्हणून अस्वस्थ आहोत, अशी मखलाशी केली शरद पवारांच्या या अस्वस्थ असण्यावर नारायण राणे यांनी मोठा राजकीय बॉम्बस्फोट केला. सिंधुदुर्ग मधल्या सभेत नारायण राणेंनी शरद पवारांना खडे बोल सुनावत तुम्हाला पंतप्रधान मोदी मित्र म्हणतात, पण मित्राविषयी चांगले बोलता येत नसेल तर निदान त्यांना वाईट तरी बोलू नका, असा सल्ला दिला. पण त्या पलीकडे जाऊन नारायण राणेंनी शरद पवारांचे अक्षरशः वाभाडे काढले.
नारायण राणे म्हणाले :
शरद पवार आज 84 वर्षाचे आहेत. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री त्यातली 2 वर्षे संरक्षणमंत्री एवढी पदे भोगूनही शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काही केले नाही. आणि म्हणे ते आज अस्वस्थ झालेत, पण मी काही नेत्यांचा चांगला अभ्यास केला आहे. शरद पवार विकासासाठी कधीही अस्वस्थ झाले नाहीत, ते जर अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगलेच नसते. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. 84 वर्षात जग इकडचे तिकडे होते. मोठी वादळे येतात, पाऊस येतो पण शरद पवारांना काहीही झाले नाही. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत. म्हणूनच ते 84 वर्षे जगले आहेत.
Sharad Pawar was never restless for development
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या मातीत हाणली पवारांची कॉपी!!; कोण कुणाच्या हातात काय देणार??, विचारणा केली!!
- Salman Khan Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या!
- मोदींच्या महाराष्ट्र मोहिमेनंतर योगींची दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी!!; सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत तुफानी सभा!!
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने EVM-VVPAT शी संबंधित प्रोटोकॉल बदलला!