विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी परस्पर राजीनामा दिला त्यांनी सहकारी पक्षांबरोबर डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य शरद पवारांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केल्याबरोबर उद्धव ठाकरे सिल्वर ओक वर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले.Sharad Pawar – Uddhav Thackeray meeting at silver oak, to bring about consensus on MVA or only to fill the gap between the two leaders??
मात्र ही भेट पूर्वनियोजित असल्याचा बातम्या काही मराठी माध्यमांनी दिल्या. कारण काल संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट नियोजित करण्यात आली. त्यानुसार सिल्वर ओक वर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होत असल्याची बातमी आहे.
पण दरम्यानच्या काळात शरद पवारांनी एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या ठाकरे गटावर एक राजकीय बॉम्ब फेकला, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना महाविकास आघाडीतल्या सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नव्हते. त्यांनी सहकारी पक्षांशी डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य पवारांनी केले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर पोहोचले. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही महाविकास आघाडीतले वेगवेगळ्या विषयांवर झालेले मतभेद मिटवण्यासाठी आहे की महाविकास आघाडी सोडून देऊन त्या दोघांमधलाच एकमेकांवरचा विश्वास टिकवण्यासाठी आहे??, हा प्रश्न तयार झाला आहे.
राहुल गांधींनी केलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, ते सातत्याने उपस्थित करत असलेला आदानी मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन या चार मुद्द्यांवर महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची वेगवेगळी मते असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाले आहे. त्यातही शरद पवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा विषय लावून धरल्यावर त्याला छेद देणारे विधान अजितदादा पवारांनी केले. गौतम अदानी यांची बाजू पवारांनी उचलून धरल्यानंतर काँग्रेस हायकमांड त्या मुद्द्यावर विरोधात गेली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी काँग्रेसला बॅकफूटवर ढकल्याच्या बातम्या आल्या. राहुल गांधी यांनी आपली तलवार म्यान केली, पण तरीही पवार सावरकरांचा मुद्दा त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतच होते म्हणून काँग्रेस हायकमांड नाराज आहे अशा बातम्या आल्या.
या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसचा एकही नेता शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर पोहोचलेला नाहीत, तर फक्त उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर पोहोचले आहेत आणि त्यांनी शरद पवारांशी चर्चा चालवली आहे. याचा अर्थ दोन्ही नेत्यांची चर्चा ही संपूर्ण महाविकास आघाडीतील मतभेद मिटविण्यासंदर्भात आहे की त्या दोघांमध्येच तयार झालेल्या काही अविश्वासाच्या मुद्द्यांवर पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी आहे?? याविषयी फार मोठी शंका तयार झाली आहे.
सुप्रीम कोर्ट निकालाच्या छायेतील चर्चा
त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचा निकाल आता कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारचे भवितव्य, त्याचबरोबर महाराष्ट्रातली नवी राजकीय समीकरणे या विषयावर ठाकरे आणि पवार यांच्या चर्चा सुरू आहे का??, यादेखील शंकेला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या अद्याप तरी दोन्ही बाजूंकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Sharad Pawar – Uddhav Thackeray meeting at silver oak, to bring about consensus on MVA or only to fill the gap between the two leaders??
महत्वाच्या बातम्या