विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केले होते. शरद पवारांना देखील आपण विचारले पाहिजे की ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले असा सवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. Radhakrishna Vikhe Patil
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की हे फडणवीसांचे षड्यंत्र असून मी ते उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी विशेष पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण गेले. आता पुन्हा एकदा महायुती आल्यावर 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता कायदेशीर प्रक्रिया जी करायची आहे ती आम्ही करत आहोत.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ही आमची पहिलीच बैठक होती, या बैठकीत आम्ही सगळ्या बाबींची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उपसमिती म्हणून आमची जी भूमिका घेतली आहे, जो आरक्षणाचा मुद्दा आहे, कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहे यावर देखील आमची चर्चा झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काय आरोप करायचा काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम फडणवीस यांनी मिळवून दिले होते. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे केले होते. फडणवीस साहेब आडकाठी कुठेही करत नाहीत. त्यामुळे जरांगे यांनी आरोप करणे योग्य नाही.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कायद्याच्या प्रक्रियेत काही बाबी अडकल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सरकार विशेष पुढाकार घेत या सगळ्या गोष्टी पाहत आहे. तसेच गणेशोत्सव आहे, अशा वेळी आपण आंदोलन करू नये. तसेच आमच्या समितीला देखील त्यांनी काही काळ दिला पाहिजे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray do for the Maratha community? Radhakrishna Vikhe Patil’s question
महत्वाच्या बातम्या
- RSS centenary : संघाच्या शताब्दीच्या वर्षात diplomatic mission जोरात!!
- आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदार + एसटी कर्मचाऱ्यांचा आज 26 ऑगस्टलाच पगार; फडणवीस सरकारचा निर्णय
- Kolkata Gangrape: कोलकाता गँगरेपच्या आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवले; 58 दिवसांनी 650 पानांचे आरोपपत्र दाखल
- Syrian National : गुजरातेत सीरियन नागरिकाला अटक; 3 साथीदारांचा शोध; गाझा पीडितांच्या नावाने निधी गोळा केला