नाशिक : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खोडा; मुंबईत 22 जागांचा वाटा मागून घालणार कोलदंडा!!, अशी राजकीय खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याचे समोर आले.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी ठाकरे बंधूंनी युती करत जागा वाटपाची चर्चा गंभीर वळणावर आणून ठेवली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लवकरच युतीची जागा वाटपाची अंतिम घोषणा करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. याच दरम्यान ते शरद पवारांच्या भेटीला सुद्धा पोहोचले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आम्ही हातमिळवणी करू. पण पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतले तर मात्र आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्वतंत्र लढू, असे संजय राऊत आणि सचिन अहिर यांनी जाहीर केले.
याच दरम्यान, मुंबई महानगर परिक्षेत्रातील कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी आदी महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी युतीचे जागावाटप जवळपास 90 % पूर्ण केल्याची बातमी समोर आली. यानिमित्ताने ठाकरे बंधूंची युती पक्की झाली.
– ठाकरे बंधूंची युती पक्की होताच पवारांची अडचण
पण याच दरम्यान, मुंबई महापालिकेतल्या 227 जागांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 22 जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई शहराध्यक्ष राखी जाधव यांनी तयार केला. तो घेऊन थेट शरद पवारांना भेटायची तयारी त्यांनी चालविली. ठाकरे बंधूंची जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आणि ती विशिष्ट वळणावर आली असताना अचानक राखी जाधव यांनी 22 जागांचा प्रस्ताव पुढे आणून ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला.
– मुंबईत ताकद कमी, तरी खोडा घालायची तयारी
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फारच कमी. त्यातच राष्ट्रवादीतली फूट आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक अजित पवारांकडे गेले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद फारच घटली. अखंड राष्ट्रवादीचे 5 – 7 नगरसेवक निवडून यायचे. आता पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद तेवढी सुद्धा उरली नाही. तरीसुद्धा ठाकरे बंधूंच्या युतीत लुडबुड करण्यासाठीच त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी 22 जागा मागायचा प्रस्ताव तयार केला. तो फक्त चर्चेच्या पातळीवर न ठेवता, तो माध्यमांमधून पुढे सरकवला. पण त्यामुळेच पवारांचा डाव उघड्यावर आला. या सगळ्या राजकीय खेळीतूनच शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालायचा असल्याचे स्पष्ट झाले.
Sharad Pawar trying to scuttle Thackeray brothers alliance
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi, : सरकारने म्हटले- नेहरूंशी संबंधित कागदपत्रे सोनिया गांधींकडे; संसदेत संबित पात्रा यांनी हे गायब झाल्याचा आरोप केला होता
- Valmik Karad : वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका; संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन फेटाळला; ठोस पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय
- नेहरूंना सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मान्य, पण त्यांना भारतरत्न द्यायला विरोध!!; पुरावा समोर
- माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा, पण पार्थच्या जमीन घोटाळ्यात नैतिकता टांगली खुंटीला!!