प्रतिनिधी
पंढरपूर : थांबलेल्या भाकरीने इतर भाकऱ्या फिरवायला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. शरद पवारांनी पंढरपुरात अभिजीत पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेश करून घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, पंढरपूर, माळशिरस, सोलापूर शहर आदी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. Sharad Pawar trying to repair NCP rather than breaking BJP in solapur district
पण 2014 नंतर ते वर्चस्व घटले. मोहिते पाटील, शिंदे, परिचारक, भालके ही राजकीय कुटुंबे राष्ट्रवादी पासून दूर गेली आणि संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होऊन 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सोलापूर जिल्ह्यात प्रभावी नेटवर्क उभारले. आता त्या नेटवर्कलाच धक्का देण्याची तयारी करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची डागडुजी आरंभली आहे. पण यामध्ये भाजपला धक्का देण्यापेक्षा आपल्याच पक्षाची फेरबांधणी आणि ती देखील अजित पवारांना नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना अनुकूल करून घेण्यासाठी पवार धडपडत आहेत. यासाठी त्यांनी आमदार रोहित पवारांना आपल्या दौऱ्यात बरोबर घेतले आहे आणि यातला पहिला पक्षप्रवेश अभिजीत पवारांच्या रूपाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर करून घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय कुटुंबांना बाजूला सारून अभिजीत पाटलांच्या रूपाने नवी भाकरी यांनी राष्ट्रवादी कडून जनतेसमोर पेश केली आहे.
अभिजीत पवारांच्या पक्षप्रवेशाचे वर्णन सर्व मराठी माध्यमांनी भाजपला धक्का या भाषेत केले आहे. पण प्रत्यक्षात भाजपला धक्का बसण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत डागडुजी हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यातही अजित पवारांनी गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रातल्या स्थानिक पातळीवर आपापले समर्थक उभे केल्याने त्यांनाही शह देण्याची गरज पवारांना वाटत आहे. कारण त्यांना शिवाय सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत उभे राहू शकत नाही, ही राजकीय वस्तुस्थिती आहे.
त्यामुळेच पवारांनी सोलापूर जिल्ह्यासाठी दोन दिवस दिले आहेत आणि त्या सर्व कालावधीत ते सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये जुन्या आणि विशेषतः नव्या कार्यकर्त्यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेसची नवी संघटनात्मक बांधणी करणार आहेत. अभिजीत पाटलांच्या पक्षप्रवेशाने त्याची सुरुवात केली आहे.
Sharad Pawar trying to repair NCP rather than breaking BJP in solapur district
महत्वाच्या बातम्या
- बारसूत रिफायनरी प्रकल्प केला, तर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र पेटवण्याची भाषा
- कोविड ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, WHO प्रमुख म्हणाले – एका वर्षापासून रुग्णसंख्येत होतेय
- कुस्तीपटूंच्या संपाचा 14 वा दिवस, FIRमध्ये 5 घटनांचा उल्लेख, बहाण्याने पोट आणि स्तनांना स्पर्श केला, वैयक्तिक नंबर मागितला
- राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात प्रचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 3 दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा!!