Thursday, 1 May 2025
  • Download App
    "रामाच्या विषयात अडकू नका" म्हणत शरद पवारांची महाविकास आघाडीत तिसऱ्या वरून किमान दुसऱ्या स्थानावर जाण्याची धडपड!! Sharad pawar trying to climb up to 2nd position in MVA

    “रामाच्या विषयात अडकू नका” म्हणत शरद पवारांची महाविकास आघाडीत तिसऱ्या वरून किमान दुसऱ्या स्थानावर जाण्याची धडपड!!

    विशेष प्रतिनिधी

    शिर्डी : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने साईबाबांच्या शिर्डीत आयोजित केलेल्या “ज्योत निष्ठेची” शिबिरात केंद्रातल्या मोदी सरकारला आणि राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारला आव्हान देण्याची भाषा जरूर झाली, पण मध्येच जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी असल्याचा कपोल कल्पित शोध लावून राष्ट्रवादीचे हे शिबिरच पूर्णपणे “डी रेल” करण्याचा प्रयत्न केला. Sharad pawar trying to climb up to 2nd position in MVA

    पण शरद पवारांनी अत्यंत चलाखीने, “रामाच्या विषयात अडकू नका”, असे सांगून शिबिर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नातून शरद पवारांनी केंद्रातल्या मोदी सरकारला आणि राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारला आव्हान देण्यापेक्षा महाविकास आघाडीत आपल्या घसरलेल्या तिसऱ्या स्थानावरून किमान शिवसेने पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर जाण्याचाच या निमित्ताने प्रयत्न केला!!

    पवारांच्या सगळ्या भाषणात मोदी गॅरेंटीला विरोध दिसला. मोदींची गॅरंटी फसवी असल्याची टीका त्यांनी केली, तर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीने डोळे वटारले की घाबरणाऱ्यांच्या विरोधात आपण लढणार असल्याचे सांगून अजितदादांवर निशाणा साधला.

     

    अजित पवारांचे साथीदार निघून गेल्यामुळे राष्ट्रवादीत वर्षानुवर्षे मागे बसलेल्यांना पहिल्या रांगेत बसण्याची संधी मिळाली,असे जयंत पाटलांनी कालच सांगितले होते. राष्ट्रवादीतले हे “रहस्य” आजही कायम राहिले. त्यामुळे पवारांचा एकूण प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीतले घसरलेले स्थान सावरण्याचा आणि किमान शिवसेनेपाठोपाठ दुसरे स्थान मिळावे हाच असल्याचे दिसून आले.

    महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने शरद पवार गटाला लोकसभेच्या फक्त 6 जागा देऊ केल्या आहेत. अजित पवार आणि त्यांचे साथीदार पवारांची साथ संगत सोडून निघून गेल्याने त्यांच्याबरोबर निवडणूक लढण्याची आणि निवडून येण्याची क्षमता असणारे सगळेच नेते सत्ताधारी गोटात जाऊन बसलेत. त्यामुळे पवारांकडे उरलेले नेते आणि कार्यकर्ते त्यांनी तिकिटे देऊन उभे केले, तरी त्यांची निवडून येण्याची क्षमता नाही, याविषयी काँग्रेस नेत्यांची खात्री आहे. त्यामुळेच पवारांना त्यांच्या राजकीय ताकदीच्या वास्तवाची जाणीव करून देऊन त्यांना लोकसभेच्या 6 जागा ऑफर केल्या आहेत.

    पवारांची ज्येष्ठता कितीही असली, तरी केंद्रीय पातळीवर ते सोनिया गांधी यांच्या नेतृत्वासमोर फिकेच पडतात. ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांपुढे पवारांची आक्रमकता चालत नाही. त्यामुळे केंद्रीय पातळीवर देखील पवारांचे स्थान त्या अर्थाने विरोधी “इंडिया” आघाडीत “ज्येष्ठ” असले तरी, पाचव्या – सहाव्या क्रमांकाचे नेते असेच शिल्लक राहते.

    महाविकास आघाडी ही पवारांची गरज

    अशा स्थितीत निदान महाराष्ट्रात तरी आपली आपले स्थान काँग्रेसपेक्षा खाली घसरू नये, यासाठी पवारांनी प्रयत्न चालविले आहेत. शिर्डीतले “ज्योत निष्ठेची” हे शिबिर हा त्या प्रयत्नांचाच एक भाग होता. तो पवारांनी साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल, तर महाविकास आघाडी म्हणूनच आपण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. वंचितला देखील आघाडीत सामील करून घ्यायला पाहिजे, असे पवार म्हणाले. यातूनच महाविकास आघाडी ही आता काँग्रेस अथवा शिवसेना या दोन पक्षांची गरज उरलेली नसून ती पवारांची जास्त गरज उरली असल्याचेच स्पष्ट होत आहे!!

    Sharad pawar trying to climb up to 2nd position in MVA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय फसवा; पहलगामवर म्हणाले- फ्री हँड दिला म्हणणे चुकीचे!