नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा शब्द दिला, पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे केवळ शरद पवारांच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पोचणार का??, असा सवाल आज समोर आलाय.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमचा पाठिंबा राहील, असे शरद पवारांनी पत्रकारांची अनौपचारिक बातचीत करताना सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
– केवळ पवारांच्या पाठिंब्यावर शक्य आहे का??
त्यानंतर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. पण म्हणून केवळ शरद पवारांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे विधान परिषदेत पोहोचतीलच याची गॅरंटी शरद पवारांनी घेतली का किंवा ती उद्धव ठाकरेंना तरी आहे का असे दोन सवाल या निमित्ताने समोर आले. कारण संख्याबळ या मुद्द्याच्या आधारे ठाकरे आणि पवार या दोघांचेही पक्ष तोकडे आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय या दोन्ही नेत्यांना राज्यसभा आणि विधान परिषद दिसली नव्हती आणि दिसण्याची शक्यताही नाही.
– पवारांच्या बिनविरोध निवडीत फडणवीसांचा हात
पण त्यापलीकडे जाऊन शरद पवारांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळाच राजकीय “डाव” टाकून शरद पवार उमेदवार असतील तर भाजप महायुती सातवा उमेदवार उभा करणार नाही अशी वातावरण निर्मिती केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही घटकांवर दबाव निर्माण झाला होता उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस या दोघांपैकी कोणीही राज्यसभेसाठी उमेदवार दिला असता आणि शरद पवारांची उमेदवारी मागे पडली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीकडून सातवा उमेदवार दिलाच असता. एकनाथ शिंदे यांनी तर रोहित टिळकांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंगच लावली होती.
– सुप्रिया सुळे मातोश्रीत
पण राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुद्धा भेट घेतली त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनी शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला नाईलाजास्तव का होईना, पण पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप महायुतीने सातवा उमेदवार दिला नाही म्हणून शरद पवारांची राज्यसभेवरची निवड बिनविरोध झाली.
– देवेंद्र फडणवीस काय करतील??
पण देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत केलेली “खेळी” शिवसेना आणि काँग्रेस यांना रोखण्यासाठी होती. आता देवेंद्र फडणवीस तशीच्या तशी “खेळी” विधानपरिषद निवडणुकीत करतील आणि उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतला मार्ग मोकळा करण्याची शक्यता आहे का??, हा खरा कळीचा सवाल आहे. कारण शरद पवारांच्या ज्येष्ठतेमुळे आणि त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची असलेल्या संबंधांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी “तो” निर्णय घेतला होता. पण उद्धव ठाकरे जर विधान परिषद निवडणुकीसाठी उभे राहिले, महायुतीकडून जादाचा उमेदवार उभाच राहणार नाही, याची सध्या तरी कुणी गॅरेंटी देत नाही. त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग केवळ पवारांच्या पाठिंब्यावर मोकळा होईल, असे मानणे राजकीय वास्तवाला धरून होण्याची शक्यता नाही.
Sharad Pawar to support uddhav Thackeray for Maharashtra state council election
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!