प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती केली आहे. पण महाविकास आघाडीचा वंचित आघाडीशी संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेटाळून लावला आहे. शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.Sharad Pawar rejected mahavikas Aghadi’s connection with Vanchit Aghadi
आम्ही वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा केलेली नाही, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार यांनी केले आहे. आगामी निवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत, मात्र वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झालेली नाही, आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असेही शरद पवार म्हणाले.
स्वतः प्रकाश आंबेडकरांनी देखील आपली युती शिवसेनेबरोबर झाली आहे. महाविकास आघाडीची त्याचा संबंध नाही, असा खुलासा आधीच केला आहे. पवारांनी आंबेडकरांच्या वक्तव्याला स्वतःच्या वक्तव्यातून दुजोरा दिला आहे.
पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले
तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रश्न केला असता पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेली आहेत तो प्रश्न आता कशाला काढायचा??, असे उत्तर पवारांनी दिले.
Sharad Pawar rejected mahavikas Aghadi’s connection with Vanchit Aghadi
महत्वाच्या बातम्या
- भारताला कोणाला पराभूत करायचे नाही, तर जग जिंकायचे आहे; पुण्यतीर्थ सप्तर्षी सत्कार सोहळ्यात भैय्याजी जोशींचे उद्गार
- साडेतीन शक्तीपीठे : चला, ऑनलाईन व्होटिंग करू; महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊ!!
- हर घर जल मोहीम : भारतातील 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना आता नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध
- पवार – भाजप संबंध : प्रकाश आंबेडकर वक्तव्यावर ठाम; भाजपसोबत जायला तयार, पण त्यांनी मनुस्मृती सोडावी!!
- ठाकरे – आंबेडकर युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नाही; नाना पटोलेंचा टोला