• Download App
    विधिमंडळास चोरमंडळ म्हटलेल्या संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले... Sharad Pawar reaction on the controversial statement of Sanjay Raut

    विधिमंडळास चोरमंडळ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘’अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधीही समर्थनीय नाही. परंतू…’’ असंही शरद पवार म्हणाले आहेत.

    प्रतिनिधी

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल कोल्हापूरात पत्रकारपरिषदेत विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा व शिवसेना(शिंदे गट) त्यांच्या विरोधात आक्रमक झाले असून हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे. तर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी संजय राऊतांची बाजू घेतल्याचे दिसून येत आहे. Sharad Pawar reaction on the controversial statement of Sanjay Raut

    संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटले आहे की, ‘’कोल्हापुरात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. यावर विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते. तसेच गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही. संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो.’’


    “उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?” फडणवीसांचा थेट सवाल!


    याशिवाय, ‘’हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या वाचले अथवा ऐकले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो.’’ असंही शरद पवार म्हणाले आहेत.

    याचबरोबर, ‘’यापूर्वी वसंतदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर ‘अलीबाबा-चाळीस चोरांचे सरकार’ अशी टीका-टिप्पणी विरोधकांकडून झाली होती. अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधीही समर्थनीय नाही. परंतू प्रकरण संयमाने हाताळावयास हवे. संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा, याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती.’’ असं शरद पवारांनी मत व्यक्त केलं आहे.

    तसेच ‘’ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केली एवढेच नव्हे तर श्री. संजय राऊत यांच्यावर कडक कारवाईची आग्रही मागणी केली त्या तक्रारदार सदस्यांचा हक्कभंग समितीत समावेश झाला. हे म्हणजे तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल?’’ असा प्रश्न उपस्थित करत शरद पवारांनी ‘’संजय राऊत हे देशातील सर्वोच्च विधिमंडळ अर्थात भारतीय संसदेतील राज्यसभेचे ज्येष्ठ व सन्माननीय सदस्य आहेत. त्यांवरील कोणत्याही प्रस्तावित कारवाईपूर्वी भारतीय संसदेतील सदस्यांवर अशी कारवाई करण्याबाबतची विधिग्राह्यता तसेच मार्गदर्शक सूचना या बाबी बारकाईने तपासून घ्यावयास हव्या.’’ असं ट्वीटद्वारे सांगितंल आहे.

    Sharad Pawar reaction on the controversial statement of Sanjay Raut

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस