विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : अवकाळी पावसाची “कृपा” पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!, असे चित्र आज नवी मुंबईत पाहायला मिळाले. सगळ्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळतो आहे, पण नेत्यांनी आपले कार्यक्रम रद्द केलेले नाहीत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने नवी मुंबईत बचत गटांचा मेळावा घेतला. या मेळाव्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी अनेक स्टॉल्स देखील मांडले होते, पण अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरले. sharad pawar rally rain today
मात्र या कार्यक्रमात शरद पवारांचे छोटेखानी भाषण झाले. पवार आणि पावसाचे किती अतूट नाते आहे याचे वर्णन सूत्रसंचालकाने केले, पण पवार साताऱ्यात भिजलेला “तो पाऊस वेगळा आणि आजचा अवकाळी पाऊस वेगळा याचे भानही सूत्रसंचालकाला उरले नाही.
शेवटी पवारांनी माईक हातात घेऊन आपले छोटेखानी भाषणे केले. महिलांनी कष्ट करून इथे अनेक स्टॉल्स उभारले आहेत. पण अवकाळी पावसामुळे त्यांच्या मनात निराशा येईल, पण आपण निराशेचे वातावरण झटकून टाकून पुन्हा उभे राहिले पाहिजे, असे आवाहन पवारांनी केले.
सातारच्या सभेत पवारांच्या डोक्यावर कोणी छत्री धरली नव्हती, पण नवी मुंबईतल्या कार्यक्रमात मात्र पवारांच्या डोक्यावर कार्यकर्त्यांनी छत्री धरली होती. जितेंद्र आव्हाड, सक्षणा सलगर वगैरे नेते पावसात भिजत उभे होते, तर प्रेक्षकांमध्ये मांडलेल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन प्रेक्षक उभे होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कष्टपूर्वक आयोजित केलेला हा कार्यक्रम अवकाळी पावसाने धुऊन नेला.
sharad pawar rally rain today
महत्वाच्या बातम्या
- 2040 पर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 40 अब्ज डॉलरची असणार
- Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झाले ७० टक्के मतदान
- पावसाची “कृपा” पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!
- तेलंगणात भाजपने 2 टक्के मते मिळवून दाखवावीत आणि मग OBC मुख्यमंत्र्याच्या बाता माराव्यात; राहुल गांधींनी डिवचले