प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बिरूदावरून सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य भर विधानसभेत केले. त्यामुळे राज्यात वाद पेटला आहे. अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन सुरु झाले आहे. अशा वेळी शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर दोन्ही होते, असे म्हणत अजित पवारांचे म्हणणे खोडून काढले. Sharad Pawar slammed ajit Pawar over his remarks on chatrapati sambhji maharaj, but kept mum over remarks on aurangajeb by jitendra avahad
छत्रपती संभाजीराजे यांना काहीजण त्यांचे काम म्हणून स्वराज्यरक्षक म्हणून उल्लेख करत असतील तर त्याला माझी काही तक्रार नाही. काही घटक आता धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील आणि फक्त ते धर्माच्या अँगलने विचार करत असतील, तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. हे मांडण्याचा त्याला अधिकार आहे. ज्याला धर्मवीर म्हणायच आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी ते म्हणावे. राज्यात धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षकवरून बिरूदावरून वाद नको. महापुरुषांवरुन अकारण वाद नको, मी अजित पवार यांचे वक्तव्य टीव्हीवरच पाहिले आहे. राज्यात लोकांचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या वेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलणे टाळले. औरंगजेब हा क्रूरकर्मा नव्हता. तो हिंदुत्वे नव्हताच असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. या वक्तव्यावर बोलण्याचे पवारांनी टाळल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार म्हणाले होते.
Sharad Pawar slammed ajit Pawar over his remarks on chatrapati sambhji maharaj, but kept mum over remarks on aurangajeb by jitendra avahad
महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; राष्ट्रवादी – काँग्रेसचा राजकीय वर्तन व्यवहार, ठाकरेंच्या शिवसेनेसह आघाडीचा कडेलोट अपरिहार्य
- आमदार मुक्ताताई टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप; दोन भाजप आमदारांच्या कर्तव्यनिष्ठेचा वस्तूपाठ
- प्रियांका गांधींचे बिघडले बोल; सगळ्या नेत्यांना अदानी – अंबानींनी खरीदले, पण राहुलला खरीदू नाही शकले!!