• Download App
    पवारांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे नाव ठेवले "शपथनामा"; बावनकुळेंनी प्रसिद्ध केला पवारांचा "खंजीरनामा"!! Sharad pawar published his "shapathnama"; BJP targets him as backstabber!!

    पवारांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे नाव ठेवले “शपथनामा”; बावनकुळेंनी प्रसिद्ध केला पवारांचा “खंजीरनामा”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला पण त्याचे नाव ठेवले “शपथनामा”; त्याची खिल्ली उडवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध केला पवारांचा “खंजीरनामा”!! Sharad pawar published his “shapathnama”; BJP targets him as backstabber!!

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या फक्त 10 जागा लढवत आहे. यासाठी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याचे नामकरण “शपथनामा” असे केले. त्यामध्ये जनतेला भरघोस आश्वासने दिली. देशात जातनिहाय जनगणनेला पाठिंबा दिला. युवक, महिला, शेतकरी यांच्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी नवीन आयोग स्थापनेचे आश्वासन दिले. आरक्षणाची मर्यादा 50% च्या वर वाढवण्याची खात्री दिली.

    परंतु भाजपने शरद पवारांच्या शपथनाम्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून शरद पवार आणि शपथ या दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध तरी आहे का??, असा सवाल करून शरद पवार आणि खंजीर या दोन शब्दांचा संबंध आहे, असे दाखवून दिले आहे

     चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट अशी :

    शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का???

    महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली.

    •  आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे!!
    •  १९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.
    •  १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.
    •  १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
    •  १९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.
    •  १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.
    •  २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली.
    •  खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का??

    Sharad pawar published his “shapathnama”; BJP targets him as backstabber!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस