विशेष प्रतिनिधी
लातूर : महाराष्ट्रातला आरक्षणाचा वाद सोडविण्याऐवजी शरद पवार वादाच्या आगीत आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत. नामांतर होऊन अनेक वर्षे झाली. तो वाद मिटला, तरी आता तो वाद पवारांनी का उकरून काढला??, फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का??,असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केला. Sharad Pawar pours oil in the fire of reservation controversy
आरक्षण बचाव रॅली सोमवारी लातूर जिल्ह्यात दाखल झाली. उजनी लामजना निलंगा निटूर त्यानंतर लातूर शहरात रॅली दाखल झाली. निलंगा येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी यांच्यावर थेट आरोप केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
शरद पवार हे जातीय तेढ निर्माण करत आहेत. नामांतराचा मुद्दा हा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. पण आता त्या वादाला ते ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते करत आहेत.
सगेसोयऱ्याचा आणि मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला, पण त्यांची मागणी मान्य झाली नाही तर ते 288 जागेवर निवडणूक लढवतील असे त्यांनी सांगितले होते. यावर मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढणे मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी लढवणं आवश्यक आहे.
सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी, मनोज जरांगे यांनी 288 जागा या लढवल्या पाहिजेत. गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी या निवडणुकीच्या माध्यमातून वेशीवर टांगल्या जातील. राज्यातील श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला संपूर्णपणे दाबून टाकत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणुकीला मनोज जरांगे यांनी सामोरे जावे.
श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरीक करायला तयार नाही. याच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड या भागातील श्रीमंत मराठे स्वतःला उत्तर प्रदेशमधील लोकासारखं सिंग म्हणून घेण्याची सुरुवात करत होते. मात्र, मोठ्याप्रमाणात टिंगलटवाळी झाल्यानंतर तो विषय मागे पडला.
Sharad Pawar pours oil in the fire of reservation controversy
महत्वाच्या बातम्या
- राजस्थानात गुरू-शिष्यांची जोडी! बागडे राज्यपाल, तर विधानसभेत यश मिळवून देणाऱ्या रहाटकर भाजप प्रभारी
- मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पहिल्या रांगेतील स्थानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीला!!
- Manoj Jarange : काही नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची मनोज जरांगेंची अखेर कबुली; पण नेत्यांचे नाव सांगायला नकार!!
- Manu Bhakar : ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दिला होता धोका, पण यंदा तू…’