विशेष प्रतिनिधी
पुणे : अजित पवारांनी शरद पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर नव्या दमाचे कार्यकर्ते पक्षात घेऊन पवार त्यांना संधी देतील, अशी अपेक्षा वाटत असताना प्रत्यक्षात इतर पक्ष फोडूनच शरद पवार आपल्या पक्षातली भरती करत आहेत. त्यातही वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत असलाच प्रकार सुरू आहे. Sharad pawar not giving chance to new faces, but breaking other parties to fill up his own NCP
राज ठाकरे यांच्या भोवतालच्या नेत्यांना कंटाळून मनसे सोडणाऱ्या वसंत मोरे यांनी अपेक्षेबरहुकूम शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातून खासदारकीची उमेदवारी मागितली. पण मूळातच शरद पवारांच्या हातात पुण्यातली उमेदवारी नसल्याने त्यांनी वसंत मोरे यांना थोडे थांबण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वसंत मोरे आता थोडे थांबून मग राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी वाजवणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवारांचे घड्याळ घड्याळ हातातून काढून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेणार आहेत. अजित पवारांनी आमदारकी सोडण्याचा दम देऊनही निलेश लंके यांनी अद्याप आमदारकी सोडलेली नाही, पण शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेऊन ती नगर लोकसभा मतदारसंघात फुंकण्याची निलेश लंके यांनी तयारी केली आहे.
नगर लोकसभेचा मतदार संघ महायुतीत भाजपकडे आहे. तिथे महायुतीचे डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपचेच खासदार आहेत. भाजप नेत्यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे, पण नगर लोकसभेचे जागा भाजपकडून काढून घेऊन अजित पवारांनी आपल्याला द्यावी अशी आमदार निलेश लंके यांची अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण करणे अजित पवारांना शक्य नव्हते. त्यामुळे निलेश लंके यांनी अजित पवारांच्या पक्षाचे घड्याळ हातातून काढून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे. नगर मधून ते विखे पाटलांना आव्हान देण्याच्या बेतात आहेत. तसाही नगर मध्ये सुजय विखे पाटलांना आव्हान देण्यासाठी शरद पवारांच्या हाताशी उमेदवार नव्हताच, तो आयता उमेदवार निलेश लंकेंच्या रूपाने पवारांना मिळाला आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून 42 आमदार घेऊन शरद पवारांपासून ते बाजूला झाले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची भरती होईल आणि त्यांना निवडणुकांमध्ये संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात शरद पवारांनी इतर पक्षांमधले कार्यकर्ते आणि नेते फोडून आणून आपल्या पक्षात भरती चालवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही निलेश लंके हे मूळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते, फक्त ते अजित पवारांकडे गेले होते पण त्यांनाच परत पक्षात घेऊन पवारांनी वाटीतले ताटात, ताटातले वाटीत हाच प्रकार केल्याचे दिसून येत आहे!!
Sharad pawar not giving chance to new faces, but breaking other parties to fill up his own NCP
महत्वाच्या बातम्या
- भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, हरियाणा राज्ये केली पुढच्या पिढीसाठी “मोकळी”; सर्व माजी मुख्यमंत्री उतरवले लोकसभेच्या मैदानात!!
- मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा ; न्यायालयाने आर्म्स ॲक्ट अंतर्गत दिला निकाल
- महाराष्ट्रात फारशा भाकऱ्या फिरवल्या नाहीत; रणजीत सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, सुभाष भामरे, रक्षा खडसे यांची तिकिटे भाजपने टिकवली!!
- महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल; खासदारांची तिकिटे कापण्याच्या माध्यमांच्या बातम्या ठरल्या खोट्या!