• Download App
    Ahilya Nagar पवारांच्या राष्ट्रवादीचे उघड्यावर आले "संस्कार"; लाखो रुपये उकळून काँग्रेसच्या महिला नेत्याला दाखविले आमदारकीचे गाजर; गुन्हा दाखल!!

    Ahilya Nagar पवारांच्या राष्ट्रवादीचे उघड्यावर आले “संस्कार”; लाखो रुपये उकळून काँग्रेसच्या महिला नेत्याला दाखविले आमदारकीचे गाजर; गुन्हा दाखल!!

    विशेष प्रतिनिधी

    अहिल्यानगर : शरद पवारांनी केलेले वेगवेगळे संस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या कृतीमधून रोज महाराष्ट्र समोर उघड्यावर येत आहेत असाच पवारांचा एक संस्कार अहिल्या नगरात उघड्यावर आला आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर पैसे उकळण्याचा गुन्हा दाखल झाला.

    विधानसभा निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेचा प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील याने काँग्रेसच्या महिला नेत्याची फसवणूक करून तिच्याकडून लाखो रुपये उकळले. संतापलेल्या महिला नेत्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठून बाळराजे पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला.

    विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो म्हणून काँग्रेस पक्षाच्या ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांच्याकडून बाळराजे पाटील याने टोकन म्हणून दीड लाख रुपये उकळले. ते मंगल भुजबळ यांनी ऑनलाइन दिले होते. याखेरीस ऑफलाईन १० लाख रुपये दिले. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवायचे तर राष्ट्रवादी काँग्रेसला निधी द्यावा लागेल असे सांगून बाळराजे पाटील यांनी मंगल भुजबळ यांची फसवणूक केली. प्रत्यक्ष त्यांना तिकीट मिळाले नाहीच. त्यामुळे त्यांनी बाळराजे पाटील यांच्याकडे पैसे परत मागितले. पण त्याने पैसे परत दिले नाहीत. म्हणून मंगल भुजबळ यांनी त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या विरोधात महिलेची फसवणूक करून पैसे उकळल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी मंगल भुजबळ या इच्छुक उमेदवार होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहिल्यानगर शहराची जागा राष्ट्रवादी शरद पवारांकडे गेली. राष्ट्रवादीने या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीर केले. पण, नाव जरी जाहीर झाले तरी त्यांना तिकीट मिळणार नाही, काँग्रेसला जागा मिळणार आहे, मात्र, त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फंड द्यावा लागेल, तिकीट निश्चित होण्यासाठी टोकन म्हणून एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून बालराजे पाटील याने आपल्याला एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने एकुण 1.5 लाख रुपये पाठवले होते. परंतु ,अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक कळमकर यांनाच उमेदवारी दिली होती.

    त्यानंतर मंगल भुजबळ यांनी बालराजे पाटील याला दिलेले पैसे परत मागितले, परंतु त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली, त्यामुळे फसवणूक झाल्याचे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भुजबळ यांनी अखेर 12 मार्च रोजी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    Sharad Pawar NCP leader extraction case in ahilya Nagar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस