• Download App
    Sharad Pawar NCP यंग ब्रिगेड म्हणून मराठी माध्यमांमध्ये वाखाखणी; पण 24 तासांत उमेदवार बदलण्याची पवारांच्या राष्ट्रवादीवर नामुष्की!!%

    Sharad Pawar NCP : यंग ब्रिगेड म्हणून मराठी माध्यमांमध्ये वाखाखणी; पण 24 तासांत उमेदवार बदलण्याची पवारांच्या राष्ट्रवादीवर नामुष्की!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sharad Pawar NCP शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीकडून यंग ब्रिगेड मैदानात उतरवली, अशी वाखाणणी मराठी माध्यमांनी केली, पण 24 तासांमध्ये उमेदवार बदलण्याची पवारांच्या पक्षावर नामुष्की ओढवली.

    शरद पवारांनी यंग ब्रिगेडला निवडणुकीत तिकीट देऊन मैदानात उतरवले, असे सांगत मराठी माध्यमांनी पवारांच्या तरुण उमेदवारांचे भरपूर वर्णन केले. परंतु प्रत्यक्षात घराणेशाहीच्या तिसऱ्या पिढीचे ते सगळे प्रतिनिधी ठरले. कारण पवारांनी आपलेच दोन नातू रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तिकीट दिली. आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटलांना तिकीट दिले. त्याचबरोबर मोहोळ मधून सिद्धी रमेश कदम हिला तिकीट दिले. सिद्धी रमेश कदम उच्चशिक्षित तरुणी आहे. तिचे वडील तुरुंगात असताना ती एकटी लढली, अशी भलामण मराठी माध्यमांनी केली. Sharad Pawar NCP

    प्रत्यक्षात रमेश कदम अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या शेकडो कोटींच्या घोटाळ्यासाठी तुरुंगात गेले होते. ते आठ वर्षांनंतर जामीनावर बाहेर आले. तो घोटाळा अद्याप कोर्टात केसच्या रूपात सुरू आहे. घोटाळ्याचा दुष्परिणाम राष्ट्रवादीला भोगाव लागू नये म्हणून पवारांना सिद्धी रमेश कदम यांची उमेदवारी बदलणे भाग पडले. Sharad Pawar NCP

    परंतु, तिची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर मोहोळ मधल्या स्थानिक कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी बारामतीतल्या गोविंद बागेत येऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी या कार्यकर्त्यांना जयंत पाटलांशी बोलायला सांगितले, मग जयंत पाटलांनी राजू खरे या तरुणाला मोहोळमधून उमेदवारी दिली, अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रत्यक्षात 24 तासाच्या आत मोहोळ मधली उमेदवारी बदलण्याची नामुष्की शरद पवारांचा राष्ट्रवादीवर ओढवली आहे.

    Sharad Pawar NCP cancelled ticket to Siddhi ramesh kadam from mohol

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल