• Download App
    पवारांसकट त्यांचे कुटुंब थोपटेंच्या दारी, पण हा कसला "मास्टर स्ट्रोक", ही तर मजबुरी!! Sharad pawar meeting with anantrao thopte, not a master stroke, but political compulsion

    पवारांसकट त्यांचे कुटुंब थोपटेंच्या दारी, पण हा कसला “मास्टर स्ट्रोक”, ही तर मजबुरी!!

    राजकारणात अडचण झाली की विरोधकालाही मित्र म्हणावे लागते, ही सर्वसामान्य बाब आहे. त्यामुळे एरवी जकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे वैरी राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे प्रसंगी एक होणे आणि त्यानंतर पुन्हा वायले होणे यात विशेष काही नाही, पण राजकारणातल्या अडचणीचे आणि मजबुरीचे जेव्हा माध्यमे “मास्टर स्ट्रोक” मध्ये रूपांतर करतात तेव्हा त्यांची कींव करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. अशीच अवस्था सध्या मराठी माध्यमांची झाली आहे.Sharad pawar meeting with anantrao thopte, not a master stroke, but political compulsion

    “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेणे याचे वर्णन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने “मास्टर स्ट्रोक” असे केले आहे. पण मूळात हा “मास्टर स्ट्रोक” आहे की मजबुरी आहे??, हे त्यांनी त्यांच्या “पवार बुद्धी”तूनच लपवून ठेवले आहे. वास्तविक आता आपली उरली सुरली बारामती वाचवण्यासाठी पवारांचा खरा धडपडाट सुरू आहे. त्यासाठीच त्यांना आपल्या विरोधकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. भोरला अनंतराव थोपटे यांच्या घरी जाणे हा खरं म्हणजे पवारांनी अनंतरावांचा उंबरठा झिजवण्यासारखेच आहे.

    पण मूळात पवार एकटेच अनंतरावांकडे गेले नव्हते. त्याआधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील अनंतराव थोपटे यांचे घर गाठले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार देखील थोपटे यांच्या घरी जाऊन आल्या होत्या. याचा अर्थ एकूण पवारांचे अख्खे कुटुंबच थोपटेंच्या दारात गेले होते.

    पण मूळात पवारांना आपल्या 40 वर्षांच्या जुन्या वैऱ्याच्या दारात का जावेच लागले?? अनंतराव थोपटे यांना भोर मधून आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी कधी बारामतीतला गोविंद बागेचा उंबरठा झिजवायला का जावे लागले नव्हते??, याचा विचार माध्यमांनी केला नाही. ज्या अनंतराव थोपटेंच्या तोंडी मुख्यमंत्रीपदाचा घास आला असताना पवारांनी त्यांना भोर मधून पराभूत केले होते, ज्या संग्राम थोपटेंना राज्यात मंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यापासून वंचित ठेवले होते, त्याच थोपटेंच्या घरी पवारांना आपल्या मुलीची बारामतीची सीट वाचविण्यासाठी जावे लागले, इतकेच नाही तर आधी मुलीला देखील पाठवावे लागले. सुनेत्रा पवारांना देखील थोपटेंच्या घराचा उंबरठा झिजवावा लागला यातच अख्ख्या पवार कुटुंबाची राजकीय मजबुरीच दिसून आली.

    अशी मजबुरी अनंतराव थोपट्यांपुढे आली नव्हती. कारण अनंतरावांनी स्वाभिमानाच्या नावाखाली कधी त्यांचा मूळ काँग्रेस पक्ष सोडून तो फोडला नाही. आजही ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेच आहेत. पक्षनिष्ठा हा अनंतरावांच्या राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे.

    पण काँग्रेस आणि शिवसेनेसारखे पक्ष फोडणाऱ्या आणि काँग्रेसच्याच विचारसरणी आणि कार्यकर्त्यांच्या बळावर स्वतःच्या राष्ट्रवादीचे भरण पोषण करणाऱ्या पवारांना आता बारामतीचीच लढाई सोपी उरलेली नाही. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांची निवडणूक महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांच्या राजकीय नशिबावर सोडून देऊन पवारांना आता फक्त आणि फक्त बारामती वर कॉन्सन्ट्रेट करावे लागत आहे आणि त्यासाठीच आपल्या विरोधकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

    उंबरठे झिजवून मिळवलेली खासदारकी

    बारामतीची लढाई आता दोन्ही पवारांसाठी तेवढी सोपी राहिलेली नाही. भले कुणीही जिंकले तरी खासदारकी पवारांच्याच घरात येईल अशा टिमक्या “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी कितीही वाजविल्या, तरी बारामतीची खासदारी कुठल्याही पवारांनी मिळवो, ती दिमाखात मिळवलेली खासदारकी राहणार नसून एकतर ती भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन मिळवलेली असेल किंवा आपल्या राजकीय वैऱ्यांच्या घरांचे उंबरठे झिजवून मिळवलेली असेल. त्यामुळे बारामतीचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी कमळाचा किंवा राजगडाचा घ्यावा लागला असेच म्हणावे लागेल. पवारांचा हा “मास्टर स्ट्रोक” नव्हे, तर ती त्यांची मजबुरी आहे!!

    Sharad pawar meeting with anantrao thopte, not a master stroke, but political compulsion

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!