• Download App
    राष्ट्रवादीतले अधोरेखित 1 : अजितदादांच्या बंडापेक्षा पवारांच्या हातून पक्ष निसटल्याची वस्तुस्थिती; कारकिर्दीच्या अखेरीस "तत्त्वा"साठी लढतोय दाखवण्याची वेळ!!|Sharad pawar lost his party, trying to show the fight for "casue" at the end of his career

    राष्ट्रवादीतले अधोरेखित 1 : अजितदादांच्या बंडापेक्षा पवारांच्या हातून पक्ष निसटल्याची वस्तुस्थिती; कारकिर्दीच्या अखेरीस “तत्त्वा”साठी लढतोय दाखवण्याची वेळ!!

    नाशिक : राष्ट्रवादी खरी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची??, या वादात अजितदादांपेक्षा बंडापेक्षा शरद पवारांच्या हातातून पक्ष निसटला. इतकेच नाही तर आयुष्यभर सत्तेच्या वळचणीचे राजकारण करताना कारकीर्दीच्या अखेरीस आपण “तत्त्वा”साठी लढतो आहोत, असे दाखवण्याची वेळ शरद पवारांवर आली, हे राष्ट्रवादीतले अधोरेखित आहे!!Sharad pawar lost his party, trying to show the fight for “casue” at the end of his career

    अजित पवारांच्या बंडाला आपला पाठिंबा नाही असे शरद पवारांना वारंवार सांगावे लागत आहे, पण त्याच वेळी छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच आमचे गुरु आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना आम्ही “सत्तेची गुरुदक्षिणा” दिली, असे उघडपणे सांगत आहेत यातूनच पवारांच्या डबल गेम राजकारणाचे “रहस्य” उलगडले आहे.

    त्या पलीकडे जाऊन शरद पवार आम्हाला मान्य आहेत, पण त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व लादणे अजिबात मान्य नाही, हेच अजितदादा गटाने या निमित्ताने अधोरेखित केले आहे.



    83 वर्षांचा योद्धा निघाला, अशी पोस्टर्स लावून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई महाराष्ट्राच्या रस्त्यावर आणतीलही, पण त्यातून शरद पवारांचा भाऊ तोरसेकर यांनी भाकीत केल्याप्रमाणे “उद्धव ठाकरे” नव्हे, तर “राज ठाकरे” होण्याची दाट शक्यता आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस मधला हा सरळ – सरळ सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्यातला सामना आहे. पण शरद पवारांनी तो स्वतःवर ओढवून घेऊन सुप्रिया सुळे यांना अजूनही “राजकीय कवचात” ठेवले आहे. 83 वर्षांचा योद्धा मैदानात आहे, पण 54 वर्षांच्या 3 टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे मात्र अजूनही “राजकीय कवचातच” आहे, हे या निमित्ताने पवारांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे.

    सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमले आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रे सोपवली. इथेच खऱ्या अर्थाने अजित विरुद्ध सुप्रिया या वादाची ठिणगी पडली. कारण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याकडेच तिकीट वाटपाची सूत्रे गेली, तर अजित पवारांचे राजकारण संपवणे हे सुप्रिया सुळे यांना सहज शक्य होईल, याचे राजकीय भान अजितदादांसारख्या चाणाक्ष नेत्याला लगेच आले आणि त्यांनी आपली खेळी करत शरद पवारांच्या हातातूनच अख्खा पक्ष काढून घेतला, ही यातली वस्तुस्थिती आहे.

    शरद पवार – अजितदादा संघर्षही जुनाच

    शरद पवार आणि अजित पवार हा संघर्ष काही ताजा नाही. तो बराच जुना किंबहुना शरद पवारांच्या कृषिमंत्री पदाच्या काळातला आहे. शरद पवार कृषिमंत्री म्हणून अत्यंत “पॉवरफुल” असताना देखील अजितदादा अनेकदा त्यांचे फोनही घ्यायचे नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत.

     सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व लादणे चूक

    शरद पवारांनी जेव्हा सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसवर लादायचा प्रयत्न केला, तो प्रयत्नच उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरला. शरद पवारांनीच राजकीय संस्कार केल्यानुसार अजितदादा आणि त्यांचे समर्थक सत्तेसाठी भाजपच्या वळचणीला निघून गेले. अजितदादांनी बंड केले हे भाष्य फार “मर्यादित” ठरेल. उलट शरद पवारांच्या हातातून पक्ष निसटला. कारण त्यांनी सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पक्षातल्या इतर नेत्यांवर लादायचा प्रयत्न केला, असे म्हणणे अधिक उचित ठरेल.

    2001 पासून प्रफुल पटेलांचा कल भाजपकडे

    त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा दुसऱ्या नंबरचा नेता शरद पवारांना सोडून गेला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. उलट 2001 पासून प्रफुल्ल पटेल यांचा कल सत्तेच्या दिशेने म्हणजे भाजपकडेच होता. भले 2004 ते 2014 या कालावधीत युपीए सत्तेवर असेल, पण 2000 नंतरचा काळ भाजपचाच आहे, असे प्रफुल पटेल शरद पवारांना नेहमी सांगायचे आणि आत्तासुद्धा भाजपची सत्ता सर्वांकष होताना दुसरा पर्याय नाही म्हणून प्रफुल्ल पटेल भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले. त्यासाठी त्यांनी पवारांना सोडले, असे तर पवारांचे निकटवर्तीयही आता म्हणत आहेत. राज ठाकरे यांनी देखील या मुद्द्याकडे आवर्जून कालच पत्रकारांचे लक्ष वेधले.

     पवार राजकीय पापे धुताहेत

    पवार खरेतर आत्ता आपली राजकीय पापे धूत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जर हातातून निसटलीच असेल, तर आपण निदान “धर्मनिरपेक्ष तत्त्वा”साठी लढतो एवढे तरी समाधान मिळवण्याचे प्रयत्न शरद पवार करत आहेत. किंबहुना तशी वेळ त्यांच्यावर त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस आली आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे आखले आहेत. ते स्वतःचा “शरद पवार” म्हणूनच प्रचार करतील. त्यांच्याभोवती त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होईल. पण भविष्यात शरद पवारांचा होणारच असेल, तर “उद्धव ठाकरे” नाही, तर “राज ठाकरे” होण्याचीच दाट शक्यता आहे. कारण राज ठाकरेंच्या सभांना जशी गर्दी होते, पण पक्ष उभा राहत नाही, तशी शरद पवारांभोवती गर्दी जमा होईल. पण त्यात लोकप्रतिनिधी नसतील. त्यांचा नवा पक्षही उभारी धरू शकणार नाही, याची कबुली पवारांचे निकटवर्तीय देऊ लागले आहेत.

    Sharad pawar lost his party, trying to show the fight for “casue” at the end of his career

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!