विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेणे किंवा दोन राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी एकमेकांनी भेट घेणे यात विशेष काही नाही. पवार कुटुंबात नुरा कुस्ती म्हणजेच खोटा संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनाही भाजपबरोबर जावे लागेल, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे देखील भाजपबरोबर जातील अशी ही “भविष्यवाणी” केली. Sharad pawar have to with the BJP after loksabha results, claims prakash ambedkar
टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले :
4 जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरेच नाही, तर शरद पवारही भाजपसोबत जातील. राज्यातील परिस्थितीच अशी आहे, की उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेच कशाला??, शरद पवारही भाजपसोबत जातील. शरद पवार यांची काहीही गॅरेंटी देता येत नाही. ते इंडी आघाडीत राहतील याची गॅरेंटी नाही. काहीही कारण काढून ते जातील. दोघेही जातील. यात नवीन काहीच नाही.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले. पण त्यांचे काँग्रेसशी पटलं नाही. त्यांना शरद पवार गटाचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यामागे जो ससेमिरा लावला आहे, त्यातून वाचायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाणं भाग आहे.
बारामतीतील मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजितदादांच्या कुटुंबीयांना भेटल्या होत्या. त्याही बातम्या होत्या. त्यामुळे सुनील तटकरे हे शरद पवार यांना भेटले असतील तर त्यात नवल नाही. पवार कुटुंबात नुरा कुस्ती म्हणजे खोटा संघर्ष सुरू आहे निवडणुकीनंतरची कुटुंबातील ही नुरा कुस्ती कुठपर्यंत जाईल हे बघायचं राहिलं आहे.
Sharad pawar have to with the BJP after loksabha results, claims prakash ambedkar
महत्वाच्या बातम्या
- मान्सूनचे शुभवर्तमान : IMDचा अंदाज 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान आगमन
- संघाचं फडकं म्हणून उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाजा अपमान!!
- स्वाती मालीवाल यांच्या जबानीनंतर दिल्ली पोलिसांमध्ये FIR दाखल; त्यात बिभव कुमारचे नाव, पण केजरीवाल अद्याप गप्प!!
- मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री आलमगीरला धक्का; कोर्टाने EDला सहा दिवसांची दिली रिमांड