• Download App
    Sharad Pawar शरद पवारांच्या पक्षाचे विलीनीकरण नव्हे; तर स्व हस्ते वाताहत!!; यशवंतरावांचे "भाग्य" सुद्धा वाट्याला नाही आले!!

    शरद पवारांच्या पक्षाचे विलीनीकरण नव्हे; तर स्व हस्ते वाताहत!!; यशवंतरावांचे “भाग्य” सुद्धा वाट्याला नाही आले!!

    मुंबई, पुणे, नाशिक यांच्यासह बहुतेक महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे कुठल्याही पक्षात विलीनीकरण झाले नाही, तर त्यांनी स्व हस्ते पक्षाची वाताहत करून घेतली. यशवंतराव चव्हाण यांनी दिग्गज नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण शरद पवारांच्या वाट्याला तेवढे सुद्धा “भाग्य” आले नाही. Sharad Pawar

    शरद पवारांना काँग्रेसने आपल्यात घेतले तर नाहीच, उलट त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा वंचित बहुजन आघाडीला सहा पट जास्त महत्त्व दिले. मुंबईत ठाकरे बंधूंनी सुद्धा पवारांच्या पक्षाला वाटण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाची पुरती वाताहात झाली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम घेण्यात मग्न राहिले आणि इकडे महापालिकांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची वाताहत त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागली किंबहुना त्यांनी ती स्व हस्ते करून घेतली.

    – पुणे – मुंबईतले शहराध्यक्ष गमावले

    महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधले शहराध्यक्ष गमावले. प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर मुंबईच्या शहराध्यक्ष राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडू नये म्हणून सुप्रिया सुळे यांनी सहा तास प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्या उलट राखी जाधव यांनी पक्ष सोडू नये म्हणून कोणीच प्रयत्न केले नाहीत उलट राकेश जाधव यांनी आपले शरद पवार पक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या पक्षात पाठवावेत, असा निरोप त्यांच्यापर्यंत गेला म्हणून राखी जाधव यांनी चिडून भाजपमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थकांनी सुद्धा भाजप मध्ये प्रवेश केला.



    – पुणे – पिंपरी चिंचवड मध्ये धडपणे युती नाही

    पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना पवार काका – पुतण्यांची पुरती दमछाक झाली. अजित पवारांनी घड्याळ चिन्हावर ताणून धरल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात झाले. शरद पवार गटाच्या नेत्यांना बैठका सोडून बाहेर पडावे लागले‌. शेवटी अमोल कोल्हे रोहित पवार आणि अजित पवार यांना गुप्त बैठका घ्याव्या लागल्या. त्या गुप्त बैठकांमधून एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण एवढे करून सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुढे शरणागती पत्करावी लागली. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 40 जागा आल्या. अजित पवारांचे राष्ट्रवादी 125 जागांवर लढणार असल्याचे बोलले गेले. पिंपरी चिंचवड मध्ये यापेक्षा कुठले वेगळे चित्र दिसले नाही.

    महाराष्ट्रातल्या बाकीच्या महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कुठे राजकारण साधून स्वतःसाठी काही मिळवावे, अशी त्यांची ताकदच नसल्याने इतरत्र त्यांना काही मिळण्याची शक्यता नव्हती. तशी अजित पवारांनी त्यांना संधी दिली सुद्धा नाही. शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अशी राजकीय वाताहत करून घेतली. किंबहुना त्यांना ती करून घ्यावी लागली.

    – पुतण्यापुढे शरणागती

    1980 च्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या चव्हाण – रेड्डी काँग्रेसला अपयश आले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे शरणागती पत्करली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तो प्रवेश करून घेताना सुद्धा इंदिरा गांधींनी यशवंतरावांना पुरते नामोहरम केले होते. पण काही झाले तरी यशवंतराव इंदिरा गांधींसारख्या दिग्गज राष्ट्रीय नेत्यांपुढे झुकले होते. ते आपल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इंदिरा काँग्रेसमध्ये यशस्वी पुनर्स्थापना करू शकले होते. त्या उलट शरद पवार आपल्या समर्थकांचे काँग्रेसमध्ये यशस्वी पुनर्स्थापन करू शकले नाहीतच. उलट त्यांना आपल्या पुतण्यापुढे राजकीय शरणागती पत्करावी लागली. स्वतःच्या पक्षाचे स्व हस्ते काँग्रेसमध्ये विलीनीकरण करता आले नाही. त्या उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा सहज विलीनीकरण घडून आले नाही. शरद पवारांना आपला पक्ष विस्कळीत होताना पाहावे लागले. दोन गुजरात्यांकडे नेतृत्व असलेल्या भाजपच्या राजकारणामुळे हे घडून आले.

    Sharad Pawar had to bow down infront of Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Adani-Pawar : सुप्रिया सुळे म्हणाल्या- गौतम भाई मोठ्या भावासारखे, अदानी म्हणाले- शरद पवार माझे मार्गदर्शक, तर अजितदादा म्हणाले- मोठं झाल्यावर लोक टीका करतात

    मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!

    62 विरुद्ध 9 : मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित आघाडीला ठरविली पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा सहा पट भारी; निवडणुकीच्या राजकारणात पवारांची किंमत घसरली!!