• Download App
    बऱ्याच दिवसांनी पवार चिडले, ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिमांचे पत्रक कसे??, या प्रश्नावर पत्रकाराला फटकारले!! Sharad Pawar got angry with journalist after a long time in pune

    बऱ्याच दिवसांनी पवार चिडले, ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिमांचे पत्रक कसे??, या प्रश्नावर पत्रकाराला फटकारले!!

    प्रतिनिधी

    पुणे : बऱ्याच दिवसांनी पवार चिडले आणि ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिमांचे पत्र कसे?, या प्रश्नावर पत्रकाराला फटकारले. पुण्यात पत्रकार परिषदेत हे घडले. Sharad Pawar got angry with journalist after a long time in pune

    पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर शरद पवारांनी विस्तृत भाष्य केले. देशात परिवर्तनाची ही नांदी आहे, असे भाकीत वर्तविले. मात्र याच पत्रकार परिषदेत पवारांना पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या सभेत मुसलमानांनी उपस्थित रहावे, असे पत्रक मुस्लिम संघटनांनी काढल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्यावर प्रतिक्रिया विचारली. मात्र त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार कुठल्या सभेला कोणी उपस्थित राहायचे हे मी सांगू का??, मला प्रश्न विचारताना काहीतरी तारतम्य बाळगा, असे म्हणून संबंधित पत्रकाराला फटकारले.

    त्यानंतर लगेच दुसऱ्या पत्रकाराने पवारांना फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी कर्नाटकात प्रकल्प उभारत असल्या विषयीचा प्रश्न विचारला. त्यामुळे पवारांचे पत्रकाराला फटकारणे उद्धव ठाकरे आणि मुस्लिम संघटनांचे पत्रक एवढ्या पुरतेच मर्यादित राहिले आणि पत्रकार परिषद पुढे सरकली.

    2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर गळती होत होती. पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये आले होते. त्यावेळी नगर जिल्ह्यात शरद पवारांना पत्रकार परिषदेत आपले नातेवाईक राष्ट्रवादी सोडून चाललेत, यासंदर्भात आपली प्रतिक्रिया काय असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता.

    त्यावेळी तुम्हाला काही सभ्यता नाही असे म्हणून पवार प्रचंड संतापले होते. त्या पत्रकाराला त्यांनी संबंधित पत्रकार परिषदेतून बाहेर काढायला लावले होते. अशा लोकांना पत्रकार परिषदेला बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवायचे असेल तर मला बोलवू नका, असे त्यांनी आयोजकांनाही सुनावले होते. त्यावेळचा त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी पवार पुण्यातल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांवर नाराज झाल्याचे दिसून आले.

    Sharad Pawar got angry with journalist after a long time in pune

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस