प्रतिनिधी
मुंबई : वारस ठरेना राष्ट्रवादीचा, पण जुंपली मात्र दोन आजी-माजी शिवसैनिकांमध्ये!!, अशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे – राऊत यांनी शरद पवारांना राष्ट्रवादीचा वारस नेमण्यात अपयश आल्याची टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ भडकले आहेत आणि त्यांनी संजय राऊतांवर शरसंधान साधले आहे. Sharad Pawar failed to choose his political successor, but fight irrupt between two shivsainiks
संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पवारांच्या निवृत्ती नाट्याची राजकीय चिरफाड करताना पवार आपला वारस ठरवण्यात अपयशी ठरण्याची टीका केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीतले अनेक जण बॅगा भरून भाजपमध्ये जायला तयार आहेत. पवारांच्या निवृत्ती नाट्याने त्यांना तूर्त रोखून धरले आहे, असेही शरसंधान साधले. मात्र त्यावर माजी शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भडकले. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे संजय राऊत यांना वाटतेय का??, असा सवाल त्यांनी नाशिकमध्ये केला.
शरद पवारांनी लोक माझे सांगाती या विस्तारित आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावरच्या वर्तणुकीवर टीकास्त्र सोडले होते. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीत फूट पडेल, असे काहीही वक्तव्य करणार नाही, असे उत्तर देऊन संयम आणि प्रगल्भता दाखविली होती. मग संजय राऊत यांना राष्ट्रवादीतले सगळे आजच उकरून काढावेसे का वाटल??, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. प्रत्यक्षात राष्ट्रवादीचा वारस ठरवण्यात अपयश आले शरद पवारांना, पण जुंपली मात्र दोन आजी-माजी शिवसैनिकांमध्ये!!, असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
Sharad Pawar failed to choose his political successor, but fight irrupt between two shivsainiks
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना