विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताने t20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी t20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यावर शरद पवारांनी योग्य वयात रिटायरमेंट बद्दल भाष्य केले, पण स्वतःच्या निवृत्ती बद्दल ते गप्प राहिले, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांची फिरकी घेतली. Sharad Pawar comments on the retirement of cricketers but he is silent on his own retirement
शरद पवारांचं वय अन् त्यांची राजकीय निवृत्ती हे मुद्दे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. आताही शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावर भाष्य केलं. शरद पवार यांनीदेखील रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली. योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा. योग्यवेळी घेतलेली निवृत्ती योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. यावरच प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रतापराव जाधव काय म्हणाले?
शरद पवारांनी स्वतःच्या बाबतीत मत प्रदर्शित करायला पाहिजे होतं. शरद पवारांनी त्यांच्या निवृत्तीची योग्य वेळ अजून सांगितली नाही. अजितदादा पवार यांनी त्यांना विचारले की तुम्ही थकलेले आहात. तुम्ही निवृत्ती घेतली पाहिजे. मात्र पवार साहेबांनी स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही. दुसऱ्याच्या निवृत्तीला प्रमाणपत्र देतात.त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेतात, याची घोषणा करावी. शरद पवार क्रिकेटच्या अनेक संस्थांचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा अभ्यास जास्त आहे. विराट आणि रोहित हे चांगले खेळाडू आहेत. त्यांचे या निर्णयामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत, असं प्रतापराव जाधव म्हणाले.
दानवेंच्या टीकेला प्रत्युत्तर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यावरही प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचे काम टीका करणे असते, म्हणून ते टीका करतात. सादर झालेले बजेट सर्वसामान्य लोकांसाठी आहे. अनेक योजना सह शेतकऱ्यांना वीजमाफी दिलीय. महिलांना सुद्धा मदत करण्याचे काम सरकार करत आहे, असं प्रतापराव जाधव म्हणाले.
Sharad Pawar comments on the retirement of cricketers but he is silent on his own retirement
महत्वाच्या बातम्या
- चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!
- T20 world cup 2024 winner : टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले, सूर्याच्या एका कॅचने फिरवली मॅच
- केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक
- राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती