• Download App
    काँग्रेसचा स्कोअर 10 ते 12, राष्ट्रवादीचा स्कोअर 8 ते 9; महाराष्ट्राच्या जनतेची "नाडी" ओळखणाऱ्या पवारांचा दावा!! Sharad pawar claims NCP to get 8 - 9 seats out of 10 they are contesting

    काँग्रेसचा स्कोअर 10 ते 12, राष्ट्रवादीचा स्कोअर 8 ते 9; महाराष्ट्राच्या जनतेची “नाडी” ओळखणाऱ्या पवारांचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या बळावर शरद पवार महाराष्ट्राच्या जनतेची “नाडी” ओळखतात, असे त्यांचे समर्थक नेहमी म्हणत असतात. महाराष्ट्राची “नाडी” ओळखण्याची “अशी” “क्षमता” मिळवलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला आहे. तो अंदाज व्यक्त करताना पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा स्कोअर 10 ते 12 आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्कोर 8 ते 9 जागांचा राहील, असा दावा केला आहे. Sharad pawar claims NCP to get 8 – 9 seats out of 10 they are contesting

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी काँग्रेस 17 तर पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला 17 पैकी 10 ते 12 जागा, तर राष्ट्रवादीला 10 पैकी 8 ते 9 जागा मिळतील असा पवारांचा दावा आहे.

    लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जळगावात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील, याचा अंदाजही त्यांनी वर्तविला. गेल्या वेळचे चित्र होते आणि आताचे चित्र वेगळे आहे. त्यात जमीन आस्मानचा फरक आहे, असे शरद पवारांनी नमूद केले. महाराष्ट्रात काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 जागा सुद्धा मिळू शकतील, असा दावा शरद पवारांनी केला.



    शरद पवार म्हणाले :

    महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त 10 जागा मागून त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. यावेळचा बदल अनुकूल दिसतो आहे. काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि राष्ट्रवादीला 8 ते 9 जागा मिळतील.

    तर भाजपच्या 400 पार आकड्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता त्यांनी 400 चा आकडा आणखी खाली आणला आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक होतील त्यावेळेस त्यांचा आकडा हा आणखी खाली आलेला दिसेल, असा दावाही शरद पवारांनी केला.

    उद्धव ठाकरेंवर ती वेळ कधीही येऊ नये

    टीव्ही 9 दिलेल्या महामुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केले होते. त्यांच्या संकटकाळात मदत करणारा पहिला माणूस मी असेन, असे मोदी म्हणाले. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख म्हटलं असेल, पण मोदींची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर कधीच येऊ नये, असे शरद पवार म्हणाले.

    Sharad pawar claims NCP to get 8 – 9 seats out of 10 they are contesting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!