विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहावेच. त्या पुस्तकाची मी वाटच पाहतो आहे. त्या पुस्तकात त्यांनी सीजे हाऊस मध्ये ईडी अधिकारी कसे आले??, त्यांनी किती मजले ताब्यात घेतले??, याविषयी लिहावे. लोक पक्ष का आणि केव्हा सोडून जातात??,यावर एक प्रकरण लिहावे, अशी खोचक सूचना शरद पवारांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केली. Sharad pawar challenges praful patel to write a book!!
शरद पवारांनी “लोक माझे सांगाती” हे आत्मचरित्र लिहिले, तसे पुस्तक मीही लिहिणार आहे. बऱ्याच आठवणी आहेत. बरेच गौप्यस्फोट करायचे आहेत, असे उद्गार प्रफुल्ल पटेल यांनी आत्तापर्यंत किमान दोनदा काढले. 5 जुलै 2023 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल हे आधी म्हणाले होते, तेच त्यांनी कर्जतच्या अधिवेशनात रिपीट केले. या वक्तव्यातून पटेलांनी शरद पवारांना त्यांनी आव्हान दिले होते.
आज शरद पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत या आव्हानाला प्रत्युत्तर दिले. प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहावेच. त्यांच्या पुस्तकाची मी वाट पाहतो आहे. त्यामध्ये त्यांनी ईडीचे अधिकारी आपल्या घरी कसे आले??, ईडीने त्या घराचे किती मजले ताब्यात घेतले??, हे लिहावे. लोक पक्ष कसा आणि का सोडतात??, यावर प्रकरण लिहावे, असे प्रतिआव्हान शरद पवारांनी दिले.
आता शरद पवारांचे हे आव्हान स्वीकारून प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहायला केव्हा बसणार आणि त्यात कोणकोणती प्रकरणे लिहिणार??, याची उत्सुकता महाराष्ट्रासह देशाला लागली आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार प्रफुल्ल पटेल त्यामध्ये इक्बाल मिर्ची, सीजे हाऊस, त्यावर पडलेले ईडीचे छापे, ईडीने जप्त केलेले चार मजले याविषयी लिहिणार का?? ते लिहिले तर काय लिहिणार??, त्याचबरोबर पवारांच्या सूचनेनुसार लोक पक्ष कसा आणि का सोडून जातात?? याचे स्वतंत्र प्रकरण लिहिणार का??, हे सवाल तयार झाले आहेत.
पण त्या पलीकडे जाऊन प्रफुल्ल पटेल एअर इंडियाचा घोटाळा, यूपीए सरकारच्या धोरणामुळे एअर इंडिया सारखी सरकारी कंपनी तोट्यात का गेली??, ती सरकारला पुन्हा टाटांनाच का विकावी लागली?? एअर इंडिया तोट्यात घालताना कोणकोणत्या खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत आणि देशातून बाहेर जाण्याचे कोणते विमान मार्ग कसे खुले केले??, त्यात कोणते “व्यवहार” झाले??, ते कोणी केले??, जेट एअरलाइन्स, किंगफिशर यांच्यासाठी कोणकोणते वशिलेबाज निर्णय घेतले?? त्यासाठी विजय मल्ल्याने त्यासाठी किती पापड लाटले?? कोणा – कोणाला, कुठे – कुठे आणि काय – काय खाऊ घातले??, याची तपशीलवार माहिती प्रफुल्ल पटेल आपल्या पुस्तकात लिहिणार का?? लवासा प्रकरणाला ते आपल्या पुस्तकातून हात घालणार का?? हात घातलाच, तर तो किती खोलवर नेणार आणि त्याचे परिणाम कुणाकुणावर आणि केव्हा होणार??, असेही कळीचे सवाल तयार झाले आहेत.
शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना पुस्तक लिहिण्याचे प्रतिआव्हान तर दिले, आता प्रफुल्ल पटेल या आव्हानाच्या भाषेला कोणत्या भाषेत प्रत्युत्तर देणार आणि प्रत्यक्षात पवारांचे आव्हान ते स्वीकारून कसे पेलणार??, याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Sharad pawar challenges praful patel to write a book!!
महत्वाच्या बातम्या
- ‘गुड फ्रेंडस… #Melodi’, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो केला शेअर
- सलमान खान-गिपीला स्पेनमधून देण्यात आली धमकी, VPNचा केला वापर; गँगस्टर लॉरेन्सच्या नावाने पोस्ट
- कंगना रनोत चंदीगडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीने स्वत: दिले हे स्पष्टीकरण
- बंगळुरूच्या तब्बल 48 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व ठिकाणी एकाच वेळी पाठवले ई-मेल