विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना पर्यायी असा “सक्षम” उमेदवार सापडेना पण तरी देखील नुकत्याच मिळालेल्या तुतारी चिन्हाचा मोह देखील सोडवेना अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. Sharad pawar can’t find capable candidate in satara loksabha constituency
शरद पवारांनी महाविकास आघाडीत मोठा राजकीय डाव खेळून सांगलीत काँग्रेसची जागा शिवसेनेच्या गळ्यात घातली. कोल्हापुरात शाहू महाराजांची उमेदवारी काँग्रेसच्या गळ्यात घातली, पण महाविकास आघाडीत स्वतःच्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा प्रश्न मात्र त्यांना अजून सोडवता आलेला नाही. तिथून श्रीनिवास पाटलांनी वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना पर्यायी ठरू शकेल, असा “सक्षम” उमेदवार पवारांना मिळायला तयार नाही.
शरद पवारांकडे शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, अभयसिंह जगताप, सुनील माने वगैरे नावे खूप आहेत. पण पवारांना ते श्रीनिवास पाटलांच्या एवढे “सक्षम” वाटत नाहीत. त्यामुळे पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची गळ घातली. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला त्यासाठी होकार भरला, पण ज्यावेळी पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवाला माणूस या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला, त्यावेळी मात्र पवार आपल्यावर जाळे टाकत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवारांच्या जाळ्यात अडकण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला.
सातारा लोकसभा मतदारसंघातून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हाताच्या पंजा या चिन्हावर लढू. काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे पवारांची खरी गोची झाली. पण एवढे होऊनही पवार साताऱ्याचा तिढा अद्याप सोडवू शकलेले नाहीत. कारण स्व पक्षाकडे “सक्षम” उमेदवार नसताना साताऱ्याच्या जागेचा मोह सोडवत नाही, त्याचबरोबर तुतारी चिन्हाचा मोह देखील सोडवत नाही, अशा दुधारी कात्रीत शरद पवार अडकले आहेत.
Sharad pawar can’t find capable candidate in satara loksabha constituency
महत्वाच्या बातम्या
- आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे
- अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी अडखळली; उत्तर प्रदेशात एक दोन नव्हे, तब्बल 9 उमेदवार बदलण्याची वेळ!!
- कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह