विशेष प्रतिनिधी
मुंबई : इकडून – तिकडून नेत्यांना घेऊनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेची आयती उमेदवार भरती करावी लागत आहे. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जिंकून येण्याची क्षमता असलेले नेतेच शिल्लक नाहीत. ते सगळे नेते अजित पवार आपल्याबरोबर मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे पवारांना इकडून – तिकडून कोणत्या नेत्यांना आपल्या पक्षात खेचून घेऊन त्यांच्या हाती तुतारी सोपवून त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी लागत आहे. Sharad pawar breaking others and awarding them loksabha candidacy
शरद पवारांनी नगर लोकसभा मतदारसंघात पारनेरचे अजित पवार समर्थक आमदार निलेश लंके यांना आपल्या पक्षात घेतले. त्यांच्या हातात तुतारी दिली आणि लोकसभेच्या मैदानात उतरवले. त्यांच्या पाठोपाठ सोशल मीडिया स्टार नितेश कराळे मास्तर, विदर्भातील आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना देखील पवारांनी आपल्या पक्षात घेऊन लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. हे सगळे नेते पवारांच्या पक्षात नवे आहेत. त्यामुळे पवारांना स्वतःच सगळीकडे फिरून त्यांचा प्रचार करावा लागून त्यांच्या उमेदवारीत जान भरावी लागणार आहे.
प्रवेशानंतर काय म्हणाले नितेश कराळे ?
नितेश कराळे म्हणाले, पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या प्रचंड आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील वाटचालीची सविस्तर चर्चा करून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रात सत्तेवर असलेले मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून हा निर्णय मी घेतला आहे. सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो आतापर्यंत विश्वास दाखवला आहे. तो विश्वास यानंतरही मी कायम ठेवीन आणि यानंतरही मी माझी कणखर भूमिका युट्युब, फेसबुक, आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून मांडत राहीन.
माजी आमदार अमर काळे यांचाही प्रवेश
विदर्भातील आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस किशोर माथणकर, राजाभाऊ ताकसांडे, आफताब खान, कराळे गुरुजी, सुधीर कोठारी हे उपस्थित होते.
शरद पवार हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून माझ्या नावाचा समावेश असेल, असे अमर काळे यांनी स्पष्ट केले. पण त्याच वेळी कराळे मास्तरांनी देखील वर्धा लोकसभा मतदारसंघातूनच राष्ट्रवादीकडे तिकीट मागितल्याने पवारांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या दोन नेत्यांमुळे वर्धेचा तिढा निर्माण झाला आहे.
Sharad pawar breaking others and awarding them loksabha candidacy
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात भारतीय वस्तूंच्या बहिष्काराच्या विरोधात पंतप्रधान हसीना; म्हणाल्या- आधी तुमच्या बायकांच्या भारतीय साड्या जाळून टाका
- दंड, व्याजासह 1700 कोटी रुपये भरा; इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काँग्रेसला नोटीस!!; पण नोटीस पाठवण्यात काही बेकायदा घडलंय का??
- गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे “शहीदीकरण”; समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!!
- जयशंकर म्हणाले- पॅलेस्टिनींकडून घरे, जमिनी आणि हक्क हिसकावले; चिनी सीमा सुरक्षेच्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही