• Download App
    देशातल्या पहिल्या नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर 5 - 6 बैठका होऊनही पवारांनीच शब्द फिरवला; अजितदादांचाही गौप्यस्फोट!! Sharad pawar betrayed amit Shah despite 5 - 6 meetings : ajit pawar

    देशातल्या पहिल्या नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर 5 – 6 बैठका होऊनही पवारांनीच शब्द फिरवला; अजितदादांचाही गौप्यस्फोट!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे “चाणक्य” असल्याचा डांगोरा मराठी माध्यमे कितीही पिटत असली तरी, प्रत्यक्षात शरद पवार शब्द फिरवण्यात किती आणि कसे माहीर आहेत, हे आत्तापर्यंत अनेकांनी उघडपणे सांगितले. त्यात आता खुद्द त्यांच्या पुतण्याने भर घालून पहाटेच्या शपथविधी बद्दल गौप्यस्फोट केले आहेत. Sharad pawar betrayed amit Shah despite 5 – 6 meetings : ajit pawar

    विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी नेमके काय आणि कसे ठरले होते, याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सगळ्यांना चकित केले होते, पण ते सरकार फक्त 78 तास टिकले होते. पहाटेच्या त्या शपथविधीच्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी आज इंदापुरात मोठा खुलासा केला.



    अजित पवारांचे गौप्यस्फोट

    2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते. देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला कुठलं मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला, तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8.00 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टिकू शकलं नाही.

    • हर्षवर्धन पाटलांशी आमची बैठक झाली होती. महायुतीत आपल्याला एकत्र काम करायचं असं ठरलं. अमित शाहांसोबत जायचं ठरलं. साखर कारखाने अडचणीत आले. तो प्रश्न अमित शाहांनी सोडवला. अंकीता पाटलांनी सांगितलं त्यांना मी सांगतो अजित पवार हा शब्द पाळणार आहे. देवेंद्रजींची ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आचारसंहितेचे काही नियम असतात. ते पाळावे लागतात.
    • अमित शाहा यांचा सहकार क्षेत्रातील विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी मिळवला आहे. मी महायुतीचा धर्म पाळणार, हा अजित पवारचा शब्द आहे. मी काल बोललो कचाकचा बटन दाबा. मग लोकं म्हणाले की, आचारसंहितेचा भंग झाला. पण अनेक जण काही बोलतात ते भंग होत नाही का??
    • उद्या बारामतीमध्ये मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. हर्षवर्धन पाटील त्यांच्या पद्धतीने सभा घेतील आणि दत्ता मामा भरणे वेगळी सभा होईल आणि त्यानंतर संयुक्त सभा होतील. देश मजबूत असेल, तर राज्य मजबूत राहतील. काही जणं जर चुकत असतील तर त्यांना सांगावं लागेल. समज – गैरसमज होऊ देऊ नका.

    भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम, ते झालं की तिसरं काम, पण आमच्या पक्षात मात्र अलबेल नव्हतं. इथे तसं चालत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आरएसएसची त्यांना शिकवण आहे. मोदींच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की संविधान बदलतील अशा थापा विरोधक मारतात!!

    Sharad pawar betrayed amit Shah despite 5 – 6 meetings : ajit pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!