• Download App
    मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा, पवार नेहमी समाज झुंजवतात; फडणवीसांचा आरोप!! Sharad Pawar and Supriya Sule are the most opposed to Maratha reservation

    मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा, पवार नेहमी समाज झुंजवतात; फडणवीसांचा आरोप!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठी आंदोलने चालली आहेत. पण मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल, तर तो शरद पवारांनीच केला होता. त्यांना अनेकदा संधी येऊनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. स्वतःच्या फायद्यासाठी विविध समाजांना त्यांनी झुंजवत ठेवले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रखर हल्लाबोल केला. Sharad Pawar and Supriya Sule are the most opposed to Maratha reservation

    महाविकास आघाडीचे सरकार असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का??, असे विचारत हा प्रश्न उडवून लावला होता, याची आठवण फडणवीसांनी करून दिली. नागपूरात येथे फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा महाविजय 2024 मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.


    देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने ओबीसी आंदोलनावर तोडगा; चंद्रपूरात तिघांचेही उपोषण मागे!!


     देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    • मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवारांनीच केला. त्यांना वारंवार संधी मिळाली होती. त्यांनी मनात आणले असते, तर मंडल आयोग लागू झाला असता तेव्हाच शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले असते. पण शरद पवारांनी मराठा समाजाला कधीच आरक्षण दिले नाही.
    • शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तरच नेतेपद आपल्याकडे राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे शरद पवारांनी लोकांना सतत झुंजवत ठेवले. महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का??
    • भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपले सरकार असताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलेही होते, पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊन देणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, हे भाजपचे वचन आहे.
    • भाजपमधील ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणे साहजिक आहे. पण दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष आपल्या समाजाला न्याय देईल, यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत समाजात विभाजनाचे लोण पसरू देऊ नका.
    • मराठा आणि ओबीसी हे समाज आपल्यासाठी केवळ व्होटबँक नाहीत. आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करुन कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही. मुळात या मुद्द्याचा निवडणुकीवर फरक पडत नाही. हे समाजाचे प्रश्न आहेत. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका. त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याची चिंता भाजपच्या कार्यकर्त्यांनी करु नये. चिंता करायची असेल तर महाराष्ट्राचे सोशल फॅब्रिक कुठेतरी उसवले जातेय, फाटतेय, त्याबद्दल विचार केला पाहिजे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. गावगाड्यावर सर्व लोक एकत्र राहिले आहेत. सगळे लोक एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येक समाजाचे महत्त्वे वेगळे आहे.
    • पंतप्रधान मोदी म्हणतात, जात, धर्म महत्त्वाचा नाही. माझ्यासाठी गरिबी ही एकच जात आहे. आरक्षणाची भावना गरिबीतून निर्माण होते. त्या भावनेपोटी आपण मागास आहोत, असे संबंधितांना वाटते. त्यामुळे आपण आरक्षण देऊच. परंतु, मागासलेपणच दूर नाही झाले तर कितीही आरक्षण देऊन फायदा होणार नाही.
    • मराठा आरक्षणावरुन विरोधकांकडून सुरु असलेल्या प्रचाराविषयी फारशी चिंता करु नका. कोणीही काहीही नॅरेटिव्ह तयार करू द्यात. हे लोक फक्त प्रसार माध्यमांत दिसणार आहेत. प्रसार माध्यमांच्या बातम्यांचा परिणाम होत असता तर भाजप कधीच निवडून आला नसता. प्रसार माध्यमांची भूमिका ही महत्त्वाची आहे. पण ज्यावेळेला एखादे नॅरेटिव्ह सत्यापासून विपरीत असते, त्यात केवळ राजकारण असले तरी ते तुमचं भाग्य बदलू शकत नाही. कारण हे नॅरेटिव्ह फक्त 4 – 5 दिवस चालते, त्यानंतर त्याची चर्चा बंद होते.
    • मराठा आरक्षणासंदर्भात भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. काही नेत्यांनी वॉररुम उघडल्या, त्यासाठी मिम्स तयार करुन सोशल मीडियावर टाकले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण शेवटी एक बोट त्यांच्याकडेच गेले, तुमचे बापजादे इतकी वर्षे सत्तेवर होते, त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही?? हा प्रश्न लोकांनीच उपस्थित केला. याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा भाजपवर विश्वास आहे.

    Sharad Pawar and Supriya Sule are the most opposed to Maratha reservation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस