प्रतिनिधी
धुळे : शरद पवारांचे राजकारण नेहमीच विश्वासघात आणि खंजीर खुपसणारे राहिले आहे. आता तर ते आणि संजय राऊत हे दोन्ही नेते राजकारणातल्या जुन्या फाटक्या आणि जीर्ण नोटांसारखे झाले आहेत, अशा तिखट शब्दांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरसंधान साधले आहे. Sharad Pawar and Sanjay Raut are outdated currency notes, targets gopichand padalkar
कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत गोपीचंद पडळकर यांची शरद पवार आणि संजय राऊत यांच्या नेहमीच्या शैलीत टीका केली. राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केला.
आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौड बंगाल करत असल्याचा घणाघाती आरोप करीत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर निशाणा साधत घरचा आहेर दिला.
आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती. धनगर समाजाच्या आरक्षणास विरोध करणारे लोक देखील शरद पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एकच आहे. म्हणून मी दर वेळेस पवारांवर बोलतो. शरद पवारांनी आधीपासूनच घाण, नीच काम केले आहे. शरद पवार आणि संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सरकार फुल स्ट्रॉंग आहे. आधीच पवारांचा चेहरा विश्वासघाताने, गद्दारीने, पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडलेला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावरती शिक्कमोर्तब केला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच वाक्य टाकल्यामुळे शरद पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरा सारखा काळा झाला आहे, असेही टीकास्त्र पडळकरांनी सोडले.
Sharad Pawar and Sanjay Raut are outdated currency notes, targets gopichand padalkar
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातले भीमाशंकर हेच बारा ज्योतिर्लिंग मधले स्थान, आसाम सरकारचा कोणताही दावा नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा
- राहुलजींच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा काँग्रेस प्रयोग; तेलंगणात 100 राम मंदिरे बांधण्याचा प्रदेशाध्यक्षांचा संकल्प!!
- BBC इन्कम टॅक्सचे सर्वेक्षण आजही जारी; BBC चा कर्मचाऱ्यांना मेल, पर्सनल इन्कमवर उत्तरे देऊ नका!!, बाकी सहकार्य करा; वर्क फ्रॉम होमही सुरू