राज्यातील जनतेने महायुती सरकारला आणखी एक संधी देण्याचा निर्धार केला आहे, असंही गोयल म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
लातूर : Piyush Goyal केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी महाराष्ट्रातील लातूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं.Piyush Goyal
ते म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुती सरकारला आणखी एक संधी देण्याचा निर्धार केला आहे. आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत. महायुतीतील सर्व पक्षांचे प्राधान्य विकासाला आहे. अशा परिस्थितीत आपण महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहोत.
ते म्हणाले की, मराठवाड्यातील जनतेने शरद पवार आणि काँग्रेसला वर्षानुवर्षे साथ दिली. मात्र, त्याऐवजी त्यांची फसवणूक झाली. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करायचे आहे, असा निर्धार येथील जनतेने केला आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेचा जोरदार कल दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ दोन लाख मतांचा फरक होता. मला विश्वास आहे की तुम्ही एकदा जनतेची दिशाभूल करू शकता. पण, पुन्हा पुन्हा करू शकत नाही.
शरद पवार केंद्रात मंत्री आणि दहा वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते पण, त्यांनी ना शेतकऱ्यांसाठी काही केले ना राज्यातील जनतेसाठी काही केले, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारने खूप विकास कामे केली असून राज्यातील जनता आम्हाला विजय मिळवून देण्यासाठी काम करेल अशी मला आशा आहे. मराठा आरक्षण देण्याचे काम महायुती सरकारने केले. त्याचवेळी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी फसवणुकीचे राजकारण केले आणि घराणेशाहीला प्रोत्साहन दिले. असल्याची टीका गोयल यांनी केली.
Sharad Pawar and Congress betrayed Marathwada Piyush Goyal
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर घणाघात, त्यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप; बदलीसाठी 40 लाख रुपये घ्यायचे
- Maharashtra CM : उद्धव ठाकरेंनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची घेतली नावं; पण पवारांच्या मनातलं नाव घेणं टाळलं!!
- Manipur : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मानंतर तणाव कायम!
- Supriya sule : “त्यांना” प्रशासनातले काही कळत नाही; देवेंद्र फडणवीसांनी काढले पवारांच्या “मनातल्या मुख्यमंत्र्यांचे” वाभाडे!!