• Download App
    काका - पुतणे 2 - 4 मतदारसंघात एकमेकांचे उमेदवार पाडणार, त्याच्या मोठ्या राणा भीमदेवी बातम्या; पण... Sharad pawar and ajit pawar will only be able to defeat each other's candidates and not BJP candidates

    काका – पुतणे 2 – 4 मतदारसंघात एकमेकांचे उमेदवार पाडणार, त्याच्या मोठ्या राणा भीमदेवी बातम्या; पण…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात काका – पुतणे फक्त 2 – 4 मतदारसंघात एकमेकांचे उमेदवार पाडणार, त्याच्या मोठ्या राणा भीमदेवी बातम्या, पण जो पक्ष तब्बल 400 जागा लढवणार आहे, त्या पक्षात म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत सूत्रे पेरण्यात मराठी माध्यमांची वानवा, अशी अवस्था आली आहे. Sharad pawar and ajit pawar will only be able to defeat each other’s candidates and not BJP candidates

    सगळ्याच मराठी माध्यमांनी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिले, अमोल कोल्हेंचा ते “गेम” करणार, अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना कामातून प्रत्युत्तर दिले. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटले. दिवसाची सुरुवात त्यांनी महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या शरद पवारांना भेटून केली वगैरे बातम्यांची भरमार चालवली आहे.

    जणू काही पवार काका – पुतणे एकमेकांविरोधात लढून महाराष्ट्रात आणि देशातच एकमेकांची सत्ता आणणार किंवा खाली खेचणार आहेत, असा आव या बातम्यांमधून मराठी माध्यमांनी आणला आहे.

    पण प्रत्यक्षात हे काका – पुतणे 2 – 4 मतदारसंघांमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडायचे काम करणार आहेत. ज्यातून बलाढ्य अशा भाजपच्या अंगावर एखादा चरोटा देखील उठणार नाही किंवा किरकोळ खरचटणारही नाही. भाजपच्या सत्तेला धक्का लावण्याची काका पुतण्याची एकमेकांबरोबर राहून किंवा एकमेकांच्या विरोधात जाऊन ताकदही नाही. पण माध्यमांनी मात्र काका – पुतण्याच्या दंडांमध्ये मोठमोठ्या बातम्यांच्या बेटकुळ्या भरल्या आहेत.

    एनडीए आघाडीतला सर्वात मोठा घटक पक्ष भाजप तब्बल 400 जागा लढविण्याची तयारीत आहे. या 400 जागांपैकी किमान 50 ते 75 विद्यमान खासदारांच्या उमेदवाऱ्या जाणार आहेत. महाराष्ट्रात कायमच सिंगल डिजिट जागा मिळवणाऱ्या पक्षाचे नेते भाकऱ्या फिरवण्याची भाषा करतात, प्रत्यक्षात ती कृती मात्र भाजपचे नेतृत्व करणार आहे.

    अनेक विद्यमान खासदारांच्या भाकऱ्या भाजप फिरवणार आहे, तरी त्यातली एकही खात्रीलायक बातमी मराठी माध्यमे देऊ शकलेली नाहीत. मराठी माध्यमांकडे भाजप अंतर्गत कुठली सूत्रेच कामच करू शकत नाहीत. भाजप मधली बित्तंबातमी मराठी माध्यमांना मिळत नाही. किंबहुना तशी बित्तंबातमी खेचून घेण्याची कुठल्याच मराठी माध्यमांची क्षमताच नाही. त्यांची ताकद आणि बुद्धी पवार काका – पुतणे एकमेकांशी कशी खेचतात याचेच चित्र रंगवण्यात खर्ची होत आहे. त्यातूनच पवारांचा मास्टर स्ट्रोक काकांनी पुतण्याविरुद्ध शड्डू ठोकले पुतण्याला धोबीपछाड दिला वगैरे पैलवानी भाषेच्या बातम्या येतात. त्या पलीकडे या माध्यमांच्या “पवारबुद्धीची” झेपच नाही!!

    महाराष्ट्रात भाजपच्या 23 खासदारांपैकी अनेकांची तिकिटे कापली जाणार आहेत, खरा मास्टर स्ट्रोक भाजपचे चाणक्य खेळणार आहेत?? पण ते नेमकी किती तिकीट कापणार आहेत??, कोणाकोणाची तिकीटे कापणार आणि त्यांच्या जागी कोणते नवे उमेदवार देणार आहेत??, याचा साधा कयासही मराठी माध्यम प्रतिनिधींना बांधता येत नाही.

    Sharad pawar and ajit pawar will only be able to defeat each other’s candidates and not BJP candidates

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्गाला मंजुरी, 3 तासांऐवजी दीड तासात होणार प्रवास

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांना भाजपची विनंती- मुंबईतील मोर्चा पुढे ढकला; गणेशोत्सवात विघ्न आणू नये- मुख्यमंत्री फडणवीस

    Radhakrishna Vikhe Patil : शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ; सरकारने जरांगेंची मागणी केली मान्य; विखे पाटलांची माहिती