महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देऊन अजित पवारांनी वर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे काकांच्या इतक्याच पुतण्याच्या मर्यादा आणि आपल्याच माणसांसाठी आपल्याच कुंपणात उड्या हे दाखवून दिले आहे!! sharad pawar and ajit pawar can’t go beyond their short political limits to expand thetheir own partries
भाजपने अशोक चव्हाणांसारख्या माजी मुख्यमंत्र्याला पक्षात सामावून घेऊन राज्यसभेची उमेदवारी दिली आणि मराठवाड्यात पक्ष विस्ताराची दालने खुली केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मुंबईतले आपल्या शिवसेनेचे राजकीय बस्तान पक्के करण्याच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकले. पण अजित पवार मात्र प्रफुल्ल पटेलांभोवतीच आपला राजकीय डाव खेळत राहिले.
याचा नेमका अर्थ काय अजित पवारांची अशी कोणती मजबुरी आहे की ज्यामुळे त्यांना प्रफुल्ल पटेल या शरद पवारांच्या माणसाखेरीज दुसरा माणूस सापडत नाही की, प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेची भीती वाटल्याने अजितदादांनी प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेतील जागा “सुरक्षित” करून घेतली??, यापैकी काहीही असो किंवा अन्य काहीही कारण असो वस्तुस्थिती हीच आहे की, शरद पवार काय किंवा अजित पवार काय, आपल्या राजकीय चौकटीच्या मर्यादा भेदू शकत नाहीत. दुसऱ्या पक्षांमधल्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावून घेऊन त्या नेत्यांना विविध ठिकाणी कामाची संधी देऊन पक्षाचा विस्तार करवून घेऊ शकत नाहीत, हेच प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीने सिद्ध केले आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शाहांच्या भेटीसाठी
वास्तविक प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची अजून तीन वर्षे मुदत शिल्लक होती. 2027 मध्ये त्यांची मुदत संपत होती. पण प्रफुल्ल पटेल यांनी त्या जागेचा राजीनामा देऊन ही जागा रिक्त करवून घेतली आणि आता राज्यसभेतल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या जागेतून उमेदवारी भरली. महायुतीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा करून काही तांत्रिक बाबींचा विचार करून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिल्याचा खुलासा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. त्यानंतर आज प्रफुल्ल पटेल यांनी त्याच्या पुढचा खुलासा केला. आपल्या राजीनामे राज्यसभाच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होईल आणि त्या जागेवर योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अजित पवारांच्या गटातून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्याच्या राजकीय घटनेचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.
नव्याने उमेदवारी पदरात पाडून घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या खासदारकीची बेगमी तर करून घेतलीच, पण त्याचबरोबर भावी राजकारणाच्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांच्यासाठी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीची जागाही रिक्त करवून घेतली. सुप्रिया सुळे तशाही लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या उमेदवारा विरोधात लढण्यास इच्छुक नाहीत. कारण त्यांना बारामतीतून पराभूत होण्याची भीती वाटते. अशा स्थितीत प्रफुल्ल पटेल यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर आपली वर्णी लावून घेऊन बारामतीच्या जागेवर राष्ट्रवादीचाच उमेदवार म्हणजे अजित पवारांचा उमेदवार महायुतीतून निवडून आणण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात असे “पवार बुद्धी”च्या माध्यमांचे मत आहे.
आणि इथेच खरी “गोम” आहे. हीच तर खरी पवारांची म्हणजेच पवार काका – पुतण्यांची मर्यादा आहे. पवारांना आपली माणसे निवडून आणण्यासाठी आपल्याच कोट्यातल्या माणसांकडून जागा रिकाम्या करून घ्याव्या लागतात. त्या जागी आपलीच माणसे भरावी लागतात. त्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक भूमिका घेऊन नव्या माणसांना, नव्या उमेदवारांना संधी देण्याची त्यांची तयारी आणि क्षमता नाही हेच यातून सिद्ध होते.
प्रफुल्ल पटेल यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर सुप्रिया सुळे उभ्या राहोत अथवा अजित पवारांच्या मर्जीतला अन्य कोणीही नेता उभा राहो, ती रिकामी झालेली जागा राष्ट्रवादीची असेल आणि ती राष्ट्रवादीतल्या “पवारांच्या माणसाकडूनच” भरली जाईल. यापेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यता नाही. याचाच अर्थ राष्ट्रवादीत नव्याने आलेल्या नेत्याला पवार काका किंवा पवार पुतण्या संधी देऊ शकत नाहीत. त्यामुळे पक्षाचा विस्तारही होत नाही, हाच त्याचा खरा अर्थ आहे.
मर्यादित कुंपणातच उड्या
बाकी काका – पुतण्यांच्या अनुयायांचे त्यांच्या गटातल्या नेत्यांचे “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर लावण्याचे प्रकार सुरूच राहणार आहेत. पण त्यासाठी पक्ष विस्ताराचा आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने पावले टाकण्याचा साधा विचारही मनात येत नाही, ही काका पुतण्यांच्या ताकदीची खरी मर्यादा आहे, जी ओलांडणे कठीण असल्यामुळेच आपल्याच माणसांसाठी आपल्याच कुंपणात उड्या सुरू आहेत!!