• Download App
    Sharad Pawar राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!

    राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!

    नाशिक : राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखराच्या बेतात असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आत्तातरी ठाम भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले. शरद पवारांना स्वतःची राज्यसभेची जागा महाविकास आघाडी कडून निवडून आणायची असल्याने आपली उमेदवारी एकमताने व्हावी यासाठी त्यांनी राष्ट्रवादीतले नेते कामाला लावलेत, म्हणून तर जयंत पाटलांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या बरोबर बैठका उरकल्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली. स्वतः सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या राज्यसभेची इच्छा बोलून दाखविली. या सगळ्या घटना घडामोडींमधून शरद पवार स्वतःच्या राज्यसभा जागेसाठी पुन्हा एकदा उद्धवसेनाच पोखरणार हे राजकीय वास्तव समोर आले.

    फौजिया खान यांच्यासाठी शिवसेनेचा “त्याग”

    कारण 2020 मध्ये फौजिया खान यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आणि शिवसेनेची एक जागा राज्यसभेतून कमी झाली. फौजिया खान राज्यसभेवर निवडून गेल्या. पण शिवसेनेचा एक खासदार राज्यसभेतून कमी झाल्याने शिवसेनेचा राज्यसभेतला खासदारांचा गट स्थापन होऊ शकला नाही. 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली त्यापैकी संजय राऊत निवडून येऊ शकले पण संजय पवार पडले त्यामुळे सुद्धा शिवसेनेला राज्यसभेतल्या गट स्थापनेसाठी एक खासदार कमी पडला. शिवसेनेकडे दोन्ही निवडणुकांमध्ये हक्काची मते असून सुद्धा त्यांना खासदार निवडून आणता आला नाही. त्यामुळे राज्यसभेत शिवसेनेचा गट स्थापन होऊ शकला नाही.



    – शिवसेनेचे तरुण नेते ठाम

    आता सुद्धा 2026 च्या निवडणुकांमध्ये शरद पवार स्वतःच्याच उमेदवारीचे घोडे पुढे दामटत असल्याने उद्धवसेनेवरच राजकीय त्याग करायची वेळ त्यांनी आणली असून आता मात्र आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्यासारखे तरुण नेते या राजकीय त्यागाला मान्यता द्यायला तयार नाहीत. 2020 आणि 2022 अशा दोन वेळेला शिवसेनेने राजकीय त्याग केला पण त्याचा तोटा पक्षाला झाला त्यामुळे 2026 च्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने राजकीय त्याग न करता आपलाच उमेदवार द्यावा, यासाठी आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरलाय.

    – पवार भाजपला डोळा मारणार

    उद्धव ठाकरे यांनीच अंतिम निर्णय घ्यायचा असला तरी त्यांना शिवसेनेच्या आमदारांचे मत डावलून चालणार नाही त्याचबरोबर शरद पवारांचा राजकीय इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण शरद पवार राज्यसभा निवडणुकीत उभे राहिले, तर ते एक तर महाविकास आघाडीच्या एकत्रित मतांमधून निवडून येतील किंवा मग शिवसेनेचा उमेदवार पाडायचा म्हणून भाजपचे नेते शरद पवारांना दुसऱ्या प्राधान्यक्रमाची मते देतील. त्यामुळे शरद पवार राज्यसभेत जातीलच तोटा मात्र उद्धवसेनेचा होईल. याचाच अर्थ असा की शरद पवार पुन्हा स्वतःच्या राज्यसभा सीट साठी उद्धवसेना पोखरतील. शिवाय राज्यसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पवार भाजपवाल्यांना डोळा मारल्याशिवाय राहणार नाहीत.

    Sharad Pawar again will break Shivsena UBT for his rajya sabha seat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन राष्ट्रवादींच्या घामासानात सगळ्याच पवारांचा एकछत्री अंमल धोक्यात!!

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; पार्थ पवार राज्यसभेवर; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होईल