• Download App
    फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!! Sharad pawar accepts his colleagues are involved in corruption

    फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!!

    नाशिक : फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात होईल, पण सत्ताधाऱ्यांना वाटेल तेव्हा त्या कपाटातून पुन्हा टेबलावर येतील, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे आपल्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची कबुलीच टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत दिली. Sharad pawar accepts his colleagues are involved in corruption

    अजित पवारांसह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारखे जुने सहकारी आपले मत डावलून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर असेपर्यंत ते सहकारी आपल्याकडे परत येतील, असे वाटत नाही. कारण आपले सहकारी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेल्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या टेबलवर ठेवलेल्या फाईली कपाटात जातील, असे त्यांना वाटले असेल तर चूक नाही. पण फक्त त्या फाईली कपाटात जातील. त्या बंद होणार नाहीत. आजचे मरण उद्यावर जाईल. केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना वाटले, की त्या फाईली परत टेबलवर येतील, असा इशारा पवारांनी दिला. भाजपला वॉशिंग पावडर, वॉशिंग मशीन वगैरे उपमा देखील पवारांनी दिली.

    पण पवारांच्या मुलाखतीतले बिट्वीन द लाईन्स ऐकले किंवा वाचले, तर हेच स्पष्ट होते, की पवारांनी आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची अप्रत्यक्ष कबुलीच देऊन टाकली आहे. किंबहुना टेबलावरच्या फाईलींचा प्रवास सांगून पवारांनी आपल्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे भवितव्य काय असेल हे सूचकपणे मुलाखतीतून सांगून टाकले आहे.

    कारण पवारांच्या सहकाऱ्यांच्या फाईली मूळात तयार झाल्या, त्या पवारांच्या सत्ता काळात. त्यावेळी दस्तूरखुद्द शरद पवार केंद्रात सत्तेवर होते आणि त्यांचे अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्या सह सगळे सहकारी महाराष्ट्रात सत्तेवर होते. त्यामुळे राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, सहकारी साखर कारखाने मोडीत काढून त्यांचे स्वस्तात खासगीकरण या सगळ्या घोटाळ्यांमध्ये पवारांचे सहकारीच अडकले. त्यांच्या फाईलींच्या थप्पीच्या थप्पी पवारांच्याच सत्ता काळात तयार होत होत्या. या फाईलींमधल्या माहितीच्या आधारेच तर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदी नेते यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वाभाडे काढत होते. अजित पवारांना घेरत होते. त्यावेळी पवार आपल्या सहकाऱ्यांचे जोरकस समर्थनच करत होते. कारण सत्तेची वळचण त्यांना तसे करू देण्याची मूभा देत होती.



    पण आता ती परिस्थिती उरलेली नाही.

    शरद पवारांच्या सहकार्यांविरुद्धचा तयार झालेल्या फाईली एका दिवसात तयार झाल्या नाहीत, तर त्या टप्प्याटप्प्याने तयार होत गेल्या आणि आज त्या फाईलींचा भार “असह्य” झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे सहकारी पवारांना सोडून मोदी – शाहांच्या भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले, याची अप्रत्यक्ष कबुली पवारांनी दिली. ही पवारांची एक प्रकारे राजकीय हार आहे म्हणजेच राजकीय पराभव आहे. कारण पवारांनी आपल्या सत्ताकाळात आपल्या सहकाऱ्यांचा सगळा भ्रष्टाचार सहन केला. त्यावर पांघरून घातले, पण फाईली तयार होण्यापासून ते आपल्या सहकाऱ्यांचा बचाव करू शकले नाहीत, इतकेच काय तर फाईली पूर्ण तयार झाल्यानंतरही पवारांना आपल्या सहकाऱ्यांचा बचाव करता आला नाही. त्यामुळेच पवारांचे जुने सहकारी पवारांच्या इच्छेविरुद्ध त्यांना सोडून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले, याची कबुली पवारांनी दिली.

    संघर्ष सहकाऱ्यांनी करावा, आपण नव्हे; पवारांचा होरा!!

    पवारांनी याच मुलाखतीत थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा केली. सुप्रीम कोर्टात जाऊन संघर्ष करून या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून आपली सुटका करून घ्यावी, अशी सूचना पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना केली. याचा अर्थच पवारांना आपल्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे मान्य आहे, पण त्यांना वाचविण्याची आपली क्षमता नसल्याचेही त्यांनी अप्रत्यक्ष स्वीकारले आहे. त्याचवेळी आपल्या जुन्या सहकार्यांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांच्या बरोबरीने सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्याची पवारांची तयारी नाही, तर संघर्ष हा सहकाऱ्यांनी परस्पर करावा आणि त्यातून सुटल्यानंतर वाटले, तर परत आपल्याकडे यावे, असा पवारांचा या मुलाखतीत खरा होरा आहे!!… “करने को पवार, भरने को जुने सहकारी!!” असा हा मामला आहे…!!

    Sharad pawar accepts his colleagues are involved in corruption

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!