• Download App
    फडणवीसांची "भविष्यवाणी" ठरली खरी; शरद पवारांनी दिली कबुली, होय... भाजपशी चर्चा केली होती!! Sharad pawar accepts, he negotiated with BJP leaders for BJP - NCP alliance government in 2014, 2017 and 2019

    फडणवीसांची “भविष्यवाणी” ठरली खरी; शरद पवारांनी दिली कबुली, होय… भाजपशी चर्चा केली होती!!

    • नाशिक – येवला दौऱ्यावर निघण्यापूर्वी शरद पवारांची कबुली

    प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची “भविष्यवाणी” खरी ठरली… सरकार स्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती, अशी कबुली शरद पवारांनी अखेर दिली. Sharad pawar accepts, he negotiated with BJP leaders for BJP – NCP alliance government in 2014, 2017 and 2019

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकापाठोपाठ शरद पवारांचे राजकारण पुरते एक्सपोज केल्यानंतर शरद पवारांना अशी कबुली देण्यावाचून पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्यांनी ही कबुली देण्याचे टाइमिंग आपल्या नाशिक – येवला दौऱ्याचे निवडले.

    मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी 2014, 2017 आणि 2019 मध्ये भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी आघाडी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली होती. काही सहकार्यांनी त्याला अनुकूलता दाखवली होती. पण अंतिम निर्णय झाला नव्हता. तो अंतिम निर्णय मी नंतर घेतला, अशी कबुली दिली.



    या आधी शरद पवार अशी कबुली द्यायला कधीच तयार नव्हते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटण्यापूर्वी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार आज ना उद्या हे कबूल करतील, असे अशी “भविष्यवाणी” केली होती. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतही ती “भविष्यवाणी” त्यांनी 29 जून रोजी रिपीट केली होती त्यानंतर 2 जुलैला राष्ट्रवादी फुटली. अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शिंदे – फडणवीस सरकार मध्ये येऊन शपथ घेतली. त्यानंतर 5 जुलैला अजित पवारांनी शरद पवारांचे पूर्ण राजकारण चव्हाट्यावर आणले. त्यांनी भाजप नेतृत्वाशी झालेल्या वाटाघाटींचा सर्व तपशील जाहीर केला. त्यामुळे शरद पवारांना भाजपशी आपण वाटाघाटी केल्या होत्या, याची कबुली देण्यापासून पर्याय उरला नाही. पण ही कबुली देताना त्यांनी 8 जुलै 2023 चा राजकीय मुहूर्त निवडला, तो देखील आपला नाशिक – येवला दौरा सुरू करण्यापूर्वी!!

    मुंबई तकला त्यांनी मुलाखत देऊन, आपण रिटायर होणार नाही. इतर कोणी सांगतात म्हणून आपण का रिटायर व्हायचे??, असा सवाल केला. त्याच वेळी सुप्रिया सुळेंना आपण कधीही संधी दिली नाही, पण प्रफुल्ल पटेल यांच्यासह बाकीच्या नेत्यांना संधी दिली. अजित पवारांना चार वेळा उपमुख्यमंत्री केले. अजून किती संधी द्यायची??, असा सवालही केला.

    पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण सरकार स्थापनेसाठी भाजपशी वाटाघाटी केल्या, अशी कबुली द्यायला पवार अजिबात तयार नव्हते. ती कबुली त्यांना अखेरीस द्यावी लागली. फक्त तोपर्यंत राष्ट्रवादी फुटली. त्यांचे सहकारी निघून गेले आणि त्यानंतर ही कबुली त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांची “भविष्यवाणी” खरी ठरली!!

    Sharad pawar accepts, he negotiated with BJP leaders for BJP – NCP alliance government in 2014, 2017 and 2019

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस