विशेष प्रतिनिधी
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना आज बारामतीतच घरचा आहेर दिला. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळं व्हाययाचा निर्णय घेतला म्हणून मला बोल लावतात, पण काहींनी, तर वयाच्या 38 व्या वर्षीच वेगळं व्हायचा निर्णय घेऊन वसंतदादा पाटलांना बाजूला केले, अशा खोचक शब्दांमध्ये अजितदादांनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले.Sharad pawar, @ 38 backstabbed vasantdada patil, ajit pawar targets him on his home turf baramati!!
मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधी घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
बारामतीमध्ये अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या प्रसंगी अजित पवार यांनी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न त्यांच्या राजकारणाचे पुरते वाभाडे काढले. आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांना, तुम्ही आता काम करू नका. आराम करा. तुमचा अनुभव आम्हाला द्या, असे सांगत असतो. मला आता संपूर्ण राज्यात फिरावे लागेल. तुम्ही साथ द्या. तुम्ही देखील काम करा, असे अजित पवार म्हणाले.
इतरांचे ऐकत बसू नका
53 पैकी 43 आमदार माझ्यासोबत आले. मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनच ही लोक माझ्यासोबत आली ना?? अनेक वरिष्ठ नेते आपल्या सोबत आहेत. थोडासा दम धरा. इथून पुढे फक्त माझे ऐका. बाकी कुणाचे ऐकत बसू नका. आता पर्यंत बाकीच्यांचे लय वर्ष ऐकले. आता माझे ऐका. मी तुम्हाला असे काही करून दाखवतो की तुम्ही पाहातच राहाल, असे सांगून अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.
तुमच्या हिताचे निर्णय घेऊ
माझ्या भूमिकेवर आज पण मोठी चर्चा होते. पण मी तुम्हाला शब्द देतो, मी जे काही करेन जो काही निर्णय घेईन, तो तुमच्या हिताचा आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चाही केली, असेही ते म्हणाले.
सत्तेत नसतो तर कामे…
जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही. मी माझे काम चोख करेन. कुणालाही काही कमी पडणार नाही. मी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेत असू तर आपण कामे करू शकतो. तुमच्या आशीर्वादाने आज मी राज्यात सत्तेवर आहे. जर मी आज सत्तेत नसतो तर कामे करायला जमले असते का?? मला तुम्ही सांगा. मला कुणावर टीका करायची इच्छा नाही. सर्वजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात, असंही त्यांनी सांगितलं.
Sharad pawar, @ 38 backstabbed vasantdada patil, ajit pawar targets him on his home turf baramati!!
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडी समर्थक बुद्धिमत्तांची लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची भाषा; तर भाजपचे 35 कोटी मतांचे टार्गेट!!
- ”भारतात अल्पसंख्याक सुखी आहेत, लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव नाही”
- संसदेचे सत्र संपले, खासदारांचे निलंबनही रद्द; पण INDI आघाडीच्या नेत्यांची आजही आंदोलनाची “जिद्द”!!
- मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय “नागरिकांचा” विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!