विशेष प्रतिनिधी
मुंबई : सकाळी मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या घरी, तर दुपारी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद उद्धव ठाकरेंच्या घरी, असा राजकीय भेटींचा सिलसिला आज झाला!! Shankaracharya of Jyotirmath, Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray at Matoshree.
मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात वाद सोडविण्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी छगन भुजबळ शरद पवारांची अपॉइंटमेंट न घेता सिल्वर पोहोचले. कालच त्यांनी बारामतीत थेट शरद पवारांवर महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली होती. मात्र अचानक यू टर्न घेऊन छगन भुजबळ आज शरद पवारांची अपॉइंटमेंट न घेता सिल्वर ओक वर पोहोचले. पवारांनी त्यांना काही काळ तिष्ठत ठेवल्याची बातमी आली. पण नंतर छगन भुजबळ यांनी स्वतःच शरद पवारांशी महाराष्ट्र शांत ठेवण्याबद्दल ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती दिली. शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला.
पण भुजबळांच्या सिल्वर ओक भेटीमुळे महाराष्ट्रात नवी समीकरणे तयार होण्याची चर्चा सुरू झाली. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनिल देशमुख यांनी छगन भुजबळांच्या घरवापसीला विरोध केला. भुजबळ अजित पवार किंवा सुनील तटकरे यांची परवानगी न घेता शरद पवारांना भेटले. त्यांनी फक्त प्रफुल्ल पटेल यांच्या कानावर या भेटीची गोष्ट घातली होती. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन शरद पवारांकडे गेल्याचे बोलले गेले. यातून शरद पवार पुन्हा “ताटातले वाटीत, वाटीतले ताटात” असेच करून आपला पक्ष मजबूत करत आहेत का??, याची चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्रात मनोज जरांगे “डबल एम” म्हणजेच मराठा + मुस्लिम असे कॉम्बिनेशन बसवण्याच्या तयारीत असताना त्यासाठी ते असदुद्दीन ओवैसी यांच्याशी संधान बांधायला तयार असताना शरद पवार आणि भुजबळ यांची भेट झाली. यातून महाराष्ट्रात नव्हे राजकीय आणि सामाजिक समीकरण तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली.
शरद पवारांना कोणत्याही स्थितीत सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसवायचे आहे. त्यासाठी ते “ताटातले वाटीत, वाटीतले ताटात” करून बेरजेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात असल्याची देखील सुप्त चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
शंकराचार्य मातोश्रीवर
पण या पार्श्वभूमीवर दुपारी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर पोहोचले. तेथे त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना आशीर्वाद दिले. उद्धव ठाकरे यांच्याशी विश्वासघात झाला. ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणजे आम्हाला आनंद होईल, असे शंकराचार्य म्हणाले. मातोश्रीच्या हॉलमध्ये ठाकरे दांपत्याने शंकराचार्यांची पाद्य पूजा केली. यावेळी संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई हे नेते देखील उपस्थित होते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी आशीर्वाद दिले.
याच शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, पण अनंत अंबानीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात आपल्या स्वतःच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ घालून मोदींना आशीर्वाद दिले होते. त्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे देखील महाराष्ट्रात वेगळ्या समीकरणाची चर्चा सुरू झाली.
Shankaracharya of Jyotirmath, Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray at Matoshree.
महत्वाच्या बातम्या
- नाव थॉमस मॅथ्यू, वय 20 वर्षे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली!
- आंध्र प्रदेशचे माजी CM जगन रेड्डी यांच्याविरुद्ध FIR; टीडीपी आमदाराचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
- ओवैसींबरोबर “डबल M” कार्ड खेळायला मनोज जरांगे तयार; पण प्रस्ताव – फ्रस्ताव नाही देणार!!
- तामिळनाडू बसपा प्रमुखाच्या हत्येतील आरोपींचे एन्काउंटर; पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना ठार