विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे सेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी “माल” म्हणून अपमान केल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. अरविंद सावंत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करून त्यांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अरविंद सावंत यांनी एएनआयशी संवाद साधताना म्हटलं होतं की, ‘त्यांची हालत तर पाहा. आयुष्यभर भाजपात होत्या आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्या आहेत. येथे “इंपोर्टेड माल” चालत नाही येथे फक्त “ओरिजनल माल” चालतो’. Shaina NC reported opp arvind sawant
अरविंद सावंत यांच्या या विधानावर शायना एनसी यांनी आक्षेप घेतला असून आपल्याला “माल” म्हटलं जात असल्याचा आरोप केला आहे. मुंबादेवीमधून शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या शायना एनसी यांनी यावर पलटवार केला असून माफी मागावी अशी मागणी केली आहे. “ते एका महिलेचा सन्मान करु शकत नाहीत. एक प्रोफेशनल महिला, जी सक्षम आहे, जी राजकारणात येते, तिच्यासाठी तुम्ही असे शब्द वापरता, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण
“माझ्याकडून महिलांचा अवमान कधीच होणार नाही. जे मी विधान केलं आहे, त्यामध्ये त्यांचं नाव कुठे आहे हे त्यांनी सांगावं. दुसरं म्हणजे ते विधान मी हिंदीत केलं होतं. त्यात मी माझ्या उमेदवारालाही माल म्हटलं होतं. ते कसं काय गाळून सांगता,” असा दावा अरविंद सावंत यांनी केला.
निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्यासाठी काम केलं. एका महिलेला ‘माल’ म्हटल्याने आता ते अडचणीत येणार आहेत. जनता त्यांची दयनीय अवस्था करेल. कारण असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यांची विचारधारा स्पष्ट आहे,” असं शायना एनसी म्हणाल्या.
तुम्हाला माफी मागावी लागेल. ही महाविनाश आघाडी आहे. अरविंद सावंत बोलत असताना काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हसत होते. मी पोलीस स्टेशनला जात आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार करेन आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार करेन. तुम्हाला माफी मागावी लागेल, असे शायना यांनी सांगितले.
राज ठाकरेंची घेतली भेट
शायना एनसी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. शायना एनसी शिवसेनेच्या मुंबादेवी मतदार संघाच्या उमेदवार आहेत. राज ठाकरेंसोबत कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचं यावेळी शायना एनसी म्हणाल्या आहेत.
Shaina NC reported opp arvind sawant
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मौलाना सज्जाद नोमानींना मनोज जरांगेंमध्ये “दिसले” गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद!!
- Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा हिशोब आता होणार
- Rajasthan : राजस्थानात गोध्रा प्रकरण असलेले पुस्तके मागे घेतले; आता शाळेत हा धडा शिकवला जाणार नाही
- Manoj Jarange जरांगेंची दिली हाक नव्या परिवर्तनाची; एकाच खात्यात 2 – 2 मंत्री, 7 – 8 उपमुख्यमंत्री करायची तयारी!!