विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यव्यापी एसटी कामगारांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. कोल्हापूरमधील काही निलंबित एसटी कामगार कर्मचारयांनी लवकरात लवकर मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी घेऊ असे सरकारला सांगितले होते. हा अनर्थ टाळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी एकूण 20 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. एमएसआरटीसी आणि राज्य सरकार यांचे मर्जिंग व्हावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे.
Shahupuri police arrested 20 employees after ST employees threatened to take Jal Samadhi
उत्तम कांबळे जे एमएसआरटीसी वर्कर्स असोसिएशनचे हेड आहेत. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना सांगितले की, आम्ही अतिथी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन करत आहोत. तरीदेखील शाहूपुरी पोलिसांनी आमच्यातील काही लोकांना ताब्यात घेतले आहे. येथे कोणताही कर्मचारी जोरजबरदस्तीने अांदाेलन करत नाहीये. ते स्वेच्छेने आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या मागण्यांसाठी आवाज उठवला तर आमचे कुठे काय चुकते? सरकारने आम्हाला अपमानित करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. असे असले तरी आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवणार आहोत, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत.
Shahupuri police arrested 20 employees after ST employees threatened to take Jal Samadhi
महत्त्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा