विशेष प्रतिनिधी
मुंबई :Vinod Tawde ‘वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं पण ‘तडीपार’ राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसला आहे!’ अशी टीका शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर केली होती. त्याला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा (म्हणजे शरद पवारांपेक्षा) सोहराबुद्दीनसारख्या लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवाद्याच्या एन्काउंटरमुळे तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल.Vinod Tawde
शाह यांनी १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे शरद पवारांनी १९७८ मध्ये विश्वासघाताची परंपरा सुरू केली असे म्हटले होते. त्याला पवारांनी उत्तर दिल्यावर पुन्हा तावडेंनी हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले आहे की, दाऊदच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयीदेखील हेच म्हटले असते का? हे पवारांनी जनतेला नक्की सांगितले पाहिजे. लोकांना देशभक्ती काय असते, देशासाठी कोण काय करते हे नीट कळते असेही तावडेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
लवासाची फाइल उघडायला लावू नका : मंत्री आशिष शेलार
मुंबई भाजप अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार पवारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही जर शाहांच्या जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला पण लवासाची फाइल उघडायला लावू नका.
Shah’s defection in terrorist encounter is patriotism; Vinod Tawde’s counterattack on Sharad Pawar’s statement
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis सुशासन…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना धक्का
- Sheikh Hasina : बांगलादेशात शेख हसीना यांच्या राजवटीत निदर्शकांवर पोलिसांची क्रूरता
- Aam Aadmi Party : आम आदमी पार्टीविरुद्ध चार एफआयआर दाखल
- satellites : भारतीय अवकाश क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात, दोन स्वदेशी स्टार्टअप्सनी केले उपग्रह प्रक्षेपित